SPECIAL REPORT : 19 गावं अन् तब्बल 70 वाघ, पण हल्ल्याची एकही घटना नाही!

स्थानिक आदिवासी वाघाला 'कुला मामा' म्हणजेच आईचा भाऊ संबोधतात. कोरकू वाघाला देवही मानतात. विस्तीर्ण प्रदेश असल्याने वाघांना फिरायला मोकळा अधिवास, खाद्य आणि पाण्याची उपलब्धता आहे.

स्थानिक आदिवासी वाघाला 'कुला मामा' म्हणजेच आईचा भाऊ संबोधतात. कोरकू वाघाला देवही मानतात. विस्तीर्ण प्रदेश असल्याने वाघांना फिरायला मोकळा अधिवास, खाद्य आणि पाण्याची उपलब्धता आहे.

  • Share this:
मेळघाट, 02 नोव्हेंबर : एकीकडे महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक वाघांचे हल्ले (Tiger attack) चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात होत असतानाच अमरावतीच्या मेळघाटातील (amravati melghat tiger reserve) वाघ मात्र शांततेत जगत आहेत. मेळघाटात व्याघ्र प्रकल्प आणि चार वन्यजीव अभयारण्य आणि एक प्रादेशिक विभाग मिळून तब्बल 291 खेडेगाव आहेत. 1998  पासून ते आजपर्यंत मेळघाटातील तब्बल 19 गावांचे  पुनवर्सन झाल्याने येथील वाघांचा आकडा आता 70 च्या वर गेला आहे. तापी, सिपना, खंडू, डोलार, गाडगा नद्यांच्या पात्रात पाणी उपलब्ध असल्याने वाघांचा मनुष्य वस्तीकडे संचार कमी असतो. लोकसंख्या आणि गुरांची मोठी संख्या असूनही हल्ल्याचे प्रमाण अतिशय तुरळक आहे. राज्यात गेल्या काही वर्षांत वाघांचे माणसावर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले असतांनाच एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात हल्ल्याचे प्रमाण निम्म्याहून अधिक आहे.  मात्र, दुसरीकडे मेळघाट व्याघ्र प्रकल्पात हल्ल्याची एकही घटना घडत नाही. मागील घटनांवर दृष्टिक्षेप टाकला तर असे आढळून येईल की, इतर व्याघ्र प्रकल्पाच्या तुलनेत मेळघाटात या संघर्षाचे प्रमाण तुरळक आहे. एकनाथ खडसेंची भाजपवर पहिली 'सर्जिकल स्ट्राईक', 60 जण राष्ट्रवादीत दाखल याचे कारण म्हणजे उत्कृष्ट पुनर्वसन, वन्यजीव व्यवस्थापन तसेच मेळघाटाच्या भौगोलिक संरचनेचा फायदा होतोय. स्थानिक आदिवासींना विविध योजनांच्याही लाभ मिळत आहे. तसेच स्थानिक आदिवासी वाघाला 'कुला मामा' म्हणजेच आईचा भाऊ संबोधतात. कोरकू  वाघाला देवही मानतात. विस्तीर्ण प्रदेश असल्याने वाघांना फिरायला मोकळा अधिवास, खाद्य आणि पाण्याची उपलब्धता तसेच उन्हाळ्यात नैसर्गिक आणि कृत्रिम पाणवठ्यावर पाणी असल्याने वाघ मनुष्यवस्ती कडे फिरकत नाहीत, असे असल्याने आपोआपच हा संघर्ष टाळल्या गेला आहे. तसंच गेल्या काही वर्षांत शिकार प्रतिबंधक दलाची कामगिरी पाहता वाघा सारखे प्राणी मुक्तपणे संचार करू लागले. त्यांच्या अधिवासाची सुरक्षा ही व्याघ्र प्रकल्पाची प्राथमिक जबाबदारी बनली. त्यांच्यासाठी जागोजागी पाणवठे तयार करणे, ट्रॅप कॅमेरे लावणे. पाणवठ्यात विष प्रयोग होऊ नये याची काळजी घेतल्या जाते. याच बरोबर व्याघ्र अधिवासात पूर्व स्वातंत्र्य मिळावे वनालगतच्या गावांचा पुनर्वसन करण्यात आले असून नजीकच्या काळात अजून काही गावांचा पुनर्वसन प्रगती पथावर आहेत. तसंच पुनर्वसितांना पूर्ण सोई सवलती देण्यात आल्या आहेत. मेळघाट हा अतिशय दुर्गम डोंगराळ भाग असल्याने वन्यप्राणी विशेषतः वाघांची पूर्ण सुरक्षा असल्याने तसेच गावांचे पुनर्वसन झाल्याने ते आपले अधिवासात मुक्त पणे संचार करू शकतात आणि इतर वन्यप्राणींची शिकार करून जीवन जगू शकतात, असं वन्य जीव अभ्यास  यादव तरटे यांनी सांगितलं. ही दोस्ती तुटायची नाय.., एकत्रच निघाली दोन मित्रांची अंत्ययात्रा, अख्खे गाव रडले स्थानिक आदिवासी कोरकू आणि मेळघाटातच्या वाघांचं हे जगावेगळे सहजीवन फक्त आपल्याला मेळघाटातच पाहायला मिळते. मेळघाटातील तब्बल चार हजार चौरस किलोमीटरच्या विस्तीर्ण अशा जंगलात आजही अनेक ठिकाणी माणसाला पोहोचणे शक्य नसल्याने वाघ तिथे सुखाने नांदत शकत आहे. मेळघाटच्या जंगल येथील वाघांना आणि स्थानिकांना अनादिकालापासून आपल्या कुशीत सांभाळत आहे. मानव वन्यजीव संघर्षाच्या विशेषतः मानव आणि वाघांच्या या जीवघेण्या संघर्षाच्या परंपरेत मेळघाटच जंगल इथे जिंकले आहे.
Published by:sachin Salve
First published: