कर लावा मात्र शेतकऱ्यांचं उत्पन्न कोण वाढवणार?

कर लावा मात्र शेतकऱ्यांचं उत्पन्न कोण वाढवणार?

मिरचीच्या खळ्यावर,ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ....मोसंबी कवडीमोल,रस्त्यावर पडून...तूरीचा बाजार उठला,खरेदी ठप्प...द्राक्षाचे भावही गडगडले..

  • Share this:

प्रविण मुधोळकर, प्राजक्ता पोळ, मुंबई

29 एप्रिल : शेतकऱ्यांवर टॅक्स लावला जावा असं मत केंद्र सरकारचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमनियन यांनी व्यक्त केलंय. टॅक्स देणाऱ्यांची संख्या वाढण्यासाठी हा प्रस्ताव विचारार्थ येतोय. पण मुळ प्रश्नाला कदाचित कुणी हात घालताना दिसत नाहीयत. ते म्हणजे टॅक्स लावण्यासाठी आधी शेतकऱ्यांचं उत्पन्न कोण वाढवणार?

मिरचीच्या खळ्यावर,ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ....मोसंबी कवडीमोल,रस्त्यावर पडून...तूरीचा बाजार उठला,खरेदी ठप्प...द्राक्षाचे भावही गडगडले..

खरं तर सरकारी धोरणानं शेतकऱ्यांची किती वाट लागलीय हे सांगण्यासाठी हे पुरेसं आहेत. पण त्यात नवीनही काही नाही. नवीन काही असेल तर शेतकऱ्यांची अशी स्थिती असताना केंद्र सरकारचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमनियन यांनी चक्क शेतकऱ्यांवर टॅक्स लावण्याचं मत व्यक्त केलंय.

श्रीमंत आणि गरीब शेतकरी अशी वर्गवारी करणं एवढं अवघड का आहे? आपण शेतकरी असं म्हणतोत त्यावेळेस असा समज होतो की गरीब शेतकरी. पण राजकीय व्यवस्था याची चर्चा का होऊ देत नाही? आपण असं का म्हणू नये की श्रीमंतावर टॅक्स लावलाच पाहिजे मग ते त्यांचं उत्पन्न कुठून येतं हे न बघता?

अरविंद सुब्रमनियन यांच्या म्हणण्यात तसं खरं तर काहीच वावगं नाही. जो श्रीमंत आहे त्याच्यावर टॅक्स लावलाच पाहिजे. मग तो शेतकरी का असेना? कमीत कमी टॅक्स मिळवण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना श्रीमंत बनवण्याचा विचार तरी करेल किंवा शेतीमालाला भाव देणं गरजेचं आहे हे तरी त्यांना कळेल किंवा सरकारच कसं शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव पाडतं हे तरी उघड होईल.

राज्यघटनेच्या तरतुदीनुसार शेती उत्पन्नावर टॅक्स लावता येत नाही. पण राज्यांना ती मुभा असल्याचं केंद्र सरकारच्या सल्लागारांचं म्हणनं आहे. एक गोष्ट हीही खरी आहे की, शेती उत्पन्नाच्या नावावर अनेक जण टॅक्सची चोरी करतात. शेतीचं उत्पन्न 31 हजार कोटी रूपये टॅक्समध्ये दाखवलं असेल तर त्यात फक्त 1400 कोटी रूपयांचं उत्पन्नच खरोखर शेतीतलं असल्याचं उघड झालंय म्हणजे बाकीचा सगळा भ्रष्टाचार. ते तरी थांबेल.

नोकरीवाले पण शेतकरी असल्याचं सांगणाऱ्यांचं ना कर्जमाफ व्हावं ना त्यांना इतर कुठल्या सुविधा मिळाव्यात अशी मागणी अलिकडे किसानपुत्र आंदोलनानं केलीय. त्याच धर्तीवर शेतकऱ्यांच्या नावाखाली शेतीतल्या योजना लाटणारे, खऱ्याखुऱ्या शेतकऱ्यांवर डल्ला मारणारे यांचा सोक्षमोक्ष होणं गरजेचंच आहे.

First published: April 29, 2017, 9:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading