SPECIAL REPORT : शिवबंधनात अडकला नेता, शहरात लागले 'आमचं ठरलं, आमदाराला पाडायचं' बॅनर्स?

SPECIAL REPORT : शिवबंधनात अडकला नेता, शहरात लागले 'आमचं ठरलं, आमदाराला पाडायचं' बॅनर्स?

काँग्रेस सोडून शिवसेनेत दाखल झालेल्या आमदाराचा पराभव करायचा असे बॅनर्स शहरभर लावण्यात आले आहे. श्रीरामपूर शहरात लावण्यात आलेले बॅनर्स चर्चेचा विषय ठरले आहे.

  • Share this:

हरिष दिमोटे, प्रतिनिधी

श्रीरामपूर, 11 सप्टेंबर :  श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांना सगळ्या गटांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. काँग्रेस सोडून शिवसेनेत दाखल झालेल्या आमदाराचा पराभव करायचा असे बॅनर्स शहरभर लावण्यात आले आहे.

श्रीरामपूर शहरात लावण्यात आलेले बॅनर्स चर्चेचा विषय ठरले आहे. आमचं ठरलंय, सत्तेसाठी ससाणे, विखे आणि थोरातांना फसवणाऱ्या गद्दार आणि बिनकामाच्या आमदाराला पाडायचं. हे बॅनर शहरभर लागले आहे. त्यावर छापणाऱ्या व्यक्तीचं नाव नाही. कोणत्याही पक्षाची निशाणी नाही. शहराच्या वेगवेगळ्या भागात, चौकात आणि प्रवेशद्वारांवर हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. अज्ञातांनी लावलेल्या हे बॅनरचं लक्ष्य भाऊसाहेब कांबळे आहेत.

आमदार असलेल्या भाऊसाहेब कांबळेंनी नुकताच काँग्रेसचा आणि आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाऊसाहेब कांबळेंचा पराभव झाला. त्यांना त्यांच्या श्रीरामपूर मतदारसंघातही पिछाडीवर राहावं लागलं. यामुळे कांबळेंनी शिवसेनेत प्रवेश केला. पण हा प्रवेश कोणत्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना रूचलेला नाही. त्यामुळे भाऊसाहेब कांबळेंच्या अडचणी वाढल्या आहेत.

=================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2019 07:16 PM IST

ताज्या बातम्या