SPECIAL REPORT : पिकविमा कंपन्यांचं धक्कादायक वास्तव, बीडचे 1 लाख शेतकरी वंचित!

SPECIAL REPORT : पिकविमा कंपन्यांचं धक्कादायक वास्तव, बीडचे 1 लाख शेतकरी वंचित!

ओरियंटल इंश्युरन्स कंपनीला शेतकऱ्यांना जवळपास 6 कोटी रुपये द्यायचे आहेत. परंतु, तांत्रिक त्रुटीचं कारण समोर केलं जातं आहे.

  • Share this:

अद्वैत मेहता, प्रतिनिधी

पुणे, 14 नोव्हेंबर : बीड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना अद्यापही गेल्या वर्षी मंजूर झालेली पीकविम्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी आता रस्त्यावर उतरले आहेत.

सरकारविरोधतला शेतकरी आक्रमकपणे रस्त्यावर उतरले आहे. त्याला कारणही तसंच आहे.. दुष्काळामुळं आधीच शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय. त्यात पिकविमा कंपनीच शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीत तारू शकते. परंतु, आता पिकविमा देण्याची वेळ आली तर, कंपन्यांकडून शेतकऱ्यांना तांत्रिक त्रुटींचं कारण दिलं जातं आहे. त्यामुळं शेतकरी, आजही 2018च्या पिकविम्याच्या रक्कमेपासून वंचित आहेत. एक-दोन नव्हे तर, बीड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही पिकविम्याची रक्कम आलेली नाही.

ओरियंटल इंश्युरन्स कंपनीला शेतकऱ्यांना जवळपास 6 कोटी रुपये द्यायचे आहेत. परंतु, तांत्रिक त्रुटीचं कारण समोर केलं जातं आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांनी तांत्रिक त्रुटींमध्ये सुधारणा केली. असं असतानाही ओरियंटल इंश्युरन्स कंपनी शेतकऱ्यांना त्यांच्याच हक्काचा पैसा देण्यास वेळकाढूपणा करतेय?, हे स्पष्ट दिसतंय.

तांत्रिक चुकींमुळे सुमारे 1 लाख शेतकरी पिकविम्यापासून वंचित असल्याचं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. कृषी अधिकारी आणि संबंधित शेतकरी यांच्याशी मेळ घालून त्रुटी दूर करू, असं आश्वासन तुर्तास तरी कंपनीच्या अधिकाऱ्यानं दिलं आहे.

राज्यात सध्या शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहितच आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे या आणखी फटका शेतकऱ्यांना बसणार, हे निश्चितच..

शेतकऱ्यांना पिकविमा मिळावा म्हणून, उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरले होते. वाटलं यानंतर, शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची गरज भासणार नाही. परंतु, इथं चित्र काही वेगळचं आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पिकविम्यासाठी आजही रस्त्यावर उतरावं लागतंय आणि प्रशासनाला जागं करावं लागतंय.

=================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 14, 2019 06:04 PM IST

ताज्या बातम्या