SPECIAL REPORT : युतीच्या निर्णयाआधीच नाशकात शिवसेना भाजपला 'ठसका' देण्याच्या तयारीत?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये सुरू असलेल्या राजकीय मिसळ पार्टीने नाशिकमधील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 21, 2019 07:38 PM IST

SPECIAL REPORT : युतीच्या निर्णयाआधीच नाशकात शिवसेना भाजपला 'ठसका' देण्याच्या तयारीत?

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 21 सप्टेंबर : नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातील सेनेच्या इच्छुक उमेदवारांनी मिसळ पार्टीच आयोजन केल्याने युतीत ठसका उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मिसळ आणि नाशिक हे समीकरण तसं नवीन नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये सुरू असलेल्या राजकीय मिसळ पार्टीने नाशिकमधील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. भाजपचा मतदार संघ असलेल्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघावर शिवसेनेचे इच्छुक उमेदवार विलास शिंदे यांनी दावा सांगत मिसळ पार्टीच्या माध्यमातून भाजपला आव्हान देत प्रचार सुरू केला आहे. या मतदारसंघातील जुन्या आणि नवीन शिवसैनिकांची मोट बांधण्यासाठी या मिसळ पार्टीच्या माध्यमातून 1 लाख शिवसैनिकांना शिवबंधन देखील बांधलं जातं आहे.

विशेष म्हणजे युती आणि जागा वाटपाबाबत वरिष्ठ पातळीवर कोणताही निर्णय झालेला नसतांना शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी देखील इच्छुक उमेदवार विलास शिंदे यांच्या मागणीला बळ दिलं आहे. शिवाय या मतदार संघावर आजवर शिवसेनेचं कसं वर्चस्व राहिलंय याचे दाखले देत ही जागा शिवसेनेला सुटावी असा आग्रह देखील धरला आहे.

नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे इच्छुक उमेदवार विलास शिंदे यांनी आयोजित केलेल्या या मिसळ पार्टीला शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री, संपर्क प्रमुख,जिल्हाप्रमुख,पालिकेतील विरोधी पक्षनेते असे सर्वच पदाधिकाऱ्यांनी अंतर्गत गटतट विसरून हजेरी लावल्याने या जागेहुन युतीत ठसका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Loading...

=================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2019 07:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...