SPECIAL REPORT : ...म्हणून ईडीकडून शरद पवारांची होणार चौकशी?

SPECIAL REPORT : ...म्हणून ईडीकडून शरद पवारांची होणार चौकशी?

राज्य सहकारी बँक प्रकरणी ईडीनं गुन्हा दाखल केल्यानंतर शरद पवार आक्रमक झाले असून शुक्रवारी ते थेट ईडीच्या कार्यालयात हजर होणार आहेत.

  • Share this:

प्रफुल्ल साळुंखे,प्रतिनिधी

मुंबई, 25 सप्टेंबर : राज्य सहकारी बँक प्रकरणी ईडीनं गुन्हा दाखल केल्यानंतर शरद पवार आक्रमक झाले असून शुक्रवारी ते थेट ईडीच्या कार्यालयात हजर होणार आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात ईडीनं ही कारवाई केल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर ईडीनं गुन्हा दाखल केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. राज्य सहकारी बँक कर्ज वितरण प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. शरद पवारांवर अशा प्रकारे गु्न्हा दाखल होण्याची ही दुसरी वेळ आहे. या प्रकरणी पवार कोणती भूमिका घेणार? अशी चर्चा सुरू असतानाचं शुक्रवारी स्वत:हून ईडीच्या कार्यालयात हजर होण्याची भूमिका पवारांनी घेतली.

खरंतर या प्रकरणी पवारांनी आक्रमक पवित्रा घेतला. दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नसल्याचं सांगतानाचं भाजपकडं अंगुलीनिर्देश केला. तर ईडीच्या निमित्तानं पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपाचं सत्र सूरु झालंय. सत्ताधाऱ्यांनी मात्र या प्रकरणी कानावर हात ठेवलेत.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीचं आक्रमक झाली आहे. छगुन भुजबळांवर कारवाई झाल्यानंतर कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन पवारांनी केलं होतं. मात्र आता खुद्द पवारांवरचं गुन्हा दाखल झाल्यामुळं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत.

शरद पवार केंद्रात कृषीमंत्री असताना नाबार्ड त्यांच्या अधिपत्याखाली होती. याकाळात नाबार्डमार्फत सहकारी संस्थांना मोठ्य़ाप्रमाणात कर्ज वाटप करण्यात आलंय. पवारांशी जवळीक असलेल्या संचालकांच्या सहकारी संस्थांना हे कर्ज वितरण करण्यात आलं आहे का? याची चौकशी केली जाणार असल्याचं कायदेतज्ज्ञांनी सांगितलं.

विधानसभा निव़डणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीचं शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्यामुळं राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळं निवडणीच्या प्रचारात हा कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

=================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 25, 2019 10:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading