SPECIAL REPORT : अयोध्येच्या निकालाबद्दल पवार का देताय इशारा, काय आहे त्याचा अर्थ?

SPECIAL REPORT : अयोध्येच्या निकालाबद्दल पवार का देताय इशारा, काय आहे त्याचा अर्थ?

1993 मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलीत पवारांना दिल्ली सोडून मुंबईत धाव घ्यावी लागली होती. बाबरीच्या पतनानंतर देशात सर्वाधिक झळ बसली होती मुंबईला

  • Share this:

मुंबई, 03 नोव्हेंबर : अयोध्या राम जन्मभूमी खटल्याचा निकाल आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पण शरद पवार याबद्दल वारंवार इशारे देत आहे. पवारांच्या या इशारांच्या नेमका अर्थ काय? देशातल्या सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक काळ चाललेल्या खटल्याचा निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. राज्यात एकीकडे टोकाचा सत्तासंघर्ष सुरू आहे आणि जुनेजाणते नेते शरद पवारांना राममंदिराचा धागा पकडून भाजप-शिवसेनेच्या नेत्यांना लवकर वाद मिटवण्याचा सल्ला दिला.

पण प्रश्न असा उरतो, राम मंदिरावर पवार वारंवार का इशारे देत आहे? 1993 मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलीत पवारांना दिल्ली सोडून मुंबईत धाव घ्यावी लागली होती. बाबरीच्या पतनानंतर देशात सर्वाधिक झळ बसली होती मुंबईला. दंगल आणि पवार मुंबईत येण्याला आणखी एक किनार होती. त्यावेळचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी पप्पू कलानी आणि भाई ठाकूर यांच्यासोबत पवारांच्या तथाकथित कनेक्शनची चौकशी सुरू केली होती.योगायोग पाहा...आज विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांचे शिलेदार प्रफुल्ल पटेल यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आले. ईडीनं पवारांचं नाव घेताच पवारांनी ईडीलाच आव्हान दिलं. निवडणुकीत राष्ट्रवादीची ताकद तोळामासा झाल्याची चर्चा होती पण पवारांनी डाव पलटवला.उत्साह दुणावलेले पवार निकालानंतर पुन्हा जोमानं महाराष्ट्र पिंजून काढायला निघालेत. या धामधुमीत अयोध्येच्या निकालाची वेळ जवळ येतेय. निकाल राम मंदिराच्या बाजूनं लागला तरी मिरवणुका काढू नका, असं आवाहन संघानं आपल्या स्वयंसेवकांना केलं आहे.पण हा निकाल देशाचं राजकारण बदलू शकतो, याची चाणाक्ष पवारांना जाणीव आहे. त्यामुळेच पवार अयोध्येच्या मुद्द्यावर वारंवार बोलत असावे.

=====================================

Published by: sachin Salve
First published: November 3, 2019, 6:37 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading