SPECIAL REPORT : भरपावसात शरद पवार पोहोचले शेतकऱ्यांच्या भेटीला!

मुंबईत सत्तेतची जमवाजमव सुरू आहे. सत्तेचं गणित कसं जमवायचं यात नेते मश्गुल आहेत. मात्र, 80 वर्ष वय असलेले शरद पवार सत्तेचा सारीपाट सोडून नाशिक जिल्ह्यात पोहोचले.

News18 Lokmat | Updated On: Nov 1, 2019 11:28 PM IST

SPECIAL REPORT : भरपावसात शरद पवार पोहोचले शेतकऱ्यांच्या भेटीला!

लक्ष्मण घाटोळ,प्रतिनिधी

नाशिक, 01 नोव्हेंबर : एकीकडे राज्यातल्या राजधानीत सरकार कसं स्थापन होणार याची समीकरणं जुळवणं सुरू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पाऊस सुरू असताना शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन पवारांनी त्यांना धीर दिला. दरम्यान आज पवारांचा दौरा सुरू असतानाच पाऊसही बरसत होता.

मुंबईत सत्तेतची जमवाजमव सुरू आहे. सत्तेचं गणित कसं जमवायचं यात नेते मश्गुल आहेत. मात्र ऐंशी वर्ष वय असलेले शरद पवार सत्तेचा सारीपाट सोडून नाशिक जिल्ह्यात पोहोचले. निवडणुकीच्या प्रचारात जसा पाऊस आला होता, तसाच पाऊस या दौऱ्यातही पाहायला मिळाला. मात्र, यावेळीही पावसामुळे पवारांनी त्यांचा दौरा आटोपता घेतला नाही. पावसातही दौरा सुरूच होता. परतीच्या पावसानं नाशिक जिल्ह्यातल्या पिकांचं अतोनात नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला. द्राक्ष आणि इतर पिकं भुईसपाट झाली आहेत.

हताश झालेल्या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन शरद पवारांनी पाहणी केली, शेतकऱ्यांना धीर दिला. झालेल्या नुकसानीची व्यथा सांगताना शेतकऱ्यांचे डोळे पाणावले होते. हातचं पिक गेल्यानं आता फक्त सरकारकडून मदत मिळावी एवढीच त्यांची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवू असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं. मात्र, सरकारनं लक्ष दिलं नाही तर कठोर भूमिका घेण्याचा इशारा पवारांनी दिला.

Loading...

राज्याच्या अनेक भागात पावसाचा धुमाकूळ अजूनही सुरूच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काढणीला आलेलं पीक गमवावं लागलंय.

नेते शेतकऱ्यांनची भेट घेऊन त्यांना धीर देत आहेत. मात्र, आता गरज आहे, ती शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची.

===================

iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-416779" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/NDE2Nzc5/">

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2019 11:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...