SPECIAL REPORT : आघाडी आणि मनसेतील अंडरस्टँडिंग, पवारांची अशीही व्युव्हरचना?

SPECIAL REPORT : आघाडी आणि मनसेतील अंडरस्टँडिंग, पवारांची अशीही व्युव्हरचना?

आघाडी आणि मनसेतली अंडरस्टँडिंग विधानसभा निवडणुकीत चमत्कार घडवू शकते. आघाडी आणि मनसेकडून राजकीय चातुर्य दाखवत तडजोड करण्यात आली.

  • Share this:

राजेश भागवत, प्रतिनिधी

जळगाव, 09 ऑक्टोबर : आघाडी आणि मनसेतली अंडरस्टँडिंग विधानसभा निवडणुकीत चमत्कार घडवू शकते. आघाडी आणि मनसेकडून राजकीय चातुर्य दाखवत तडजोड करण्यात आली. जळगाव जिल्ह्यात तर शिवसेना बंडखोरासाठी राष्ट्रवादीनं माघार घेतली. खुद्द शरद पवारांनी याची कबुली दिली.

शरद पवारांचं राजकीय कसब या निवडणुकीत पुन्हा पाहायला मिळतंय. सत्ताधारी शिवसेना आणि भाजपची ताकद प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मनसेला आघाडीत घेतलं नसलं तरी काही तडजोडी करण्याचं सामंजस्य काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दाखवलं.

जळगाव जिल्ह्यात तर शिवसेना बंडखोरासाठी आघाडीनं इलेक्टिव्ह मेरिटला प्राधान्य दिलं. मुक्ताईनगरमध्ये भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसेंना तिकीट देण्यात आलंय. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसनं रवींद्र पाटील यांना तिकीट दिलं होतं. मात्र, शिवसेनेचे बंडखोर चंद्रकांत पाटील प्रभावी उमेदवार वाटल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र पाटील यांनी माघार घेतली.

सत्ताधारी भाजप शिवसेनेचे उमेदवार अनेक मतदारसंघात प्रभावी आहेत. त्यांच्या विरोधात लढताना आघाडी आणि मनसे वेगवेगळे लढले तर त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होणार आहे. यामुळे निवडणुकीच्या आधी एकत्र येण्याऐवजी आघाडी आणि मनसेनं आता वेगळी रणनिती आखली आहे. आघाडी आणि मनसेची ही रणनिती कितपत यशस्वी होते, हे आता निकालानंतर कळेल.

============================

Published by: sachin Salve
First published: October 9, 2019, 9:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading