आसिफ मुरसल,सांगली, 13 मार्च : सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपमध्ये उमेदवारीसाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनंही परंपरागत बालेकिल्ला पुन्हा मिळवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात भाजपच्या आमदारांची संख्या ही सर्वात जास्त आहे. अनेक नगरपालिकांमध्ये भाजपचं वर्चस्व आहे. ही सर्व जमेची बाजू असल्यानं भाजपचं पारडं सध्या तरी जड दिसतं आहे. त्यामुळे काँग्रेसला जिल्ह्यात मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.