SPECIAL REPORT : सेम आबांची स्टाईल, आईसाठी रोहितने घेतली खांद्यावर प्रचाराची धुरा!

रोहित प्रसार माध्यमांसोबत आत्मविश्वासानं बोलताना दिसतो. रोहितचा आबांसारखा हा आत्मविश्वास पाहून त्याची आई सुमनताई पाटील गहिवरून गेल्यात.

News18 Lokmat | Updated On: Oct 8, 2019 07:27 AM IST

SPECIAL REPORT : सेम आबांची स्टाईल, आईसाठी रोहितने घेतली खांद्यावर प्रचाराची धुरा!

आसिफ मुरसल,प्रतिनिधी

सांगली, 08 ऑक्टोबर : राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांचा मुलगा रोहितनं राजकारणात पाऊल टाकलं आहे. आबांच्या पावलावर पाऊल टाकत रोहितनं आश्वासक वाटचाल सुरू केली आहे. रोहितमध्ये दिसणारी आबांची छाप हा त्याचा प्लस पॉईंट ठरत आहे.

आर. आर. पाटील यांची कार्यकर्त्यांसोबत आणि नागरिकांसोबत संवाद साधण्याची अनोखी हातोटी होती. आबा सहजपणे कार्यकर्त्यांमध्ये मिसळून जायचे. आता आबांचा मुलगा रोहित पाटील राजकारणात उतरलाय. आईचा निवडणुकीचा प्रचार करताना रोहितमध्ये आबांची झलक पाहायला मिळते.

रोहितची बहिण स्मिताही राजकारणात होती. राष्ट्रवादी युवती काँग्रेसचं अध्यक्षपद स्मितानं भूषवलं होतं. मात्र, लग्नानंतर स्मिता राजकीय पटलावरून बाजूला गेली. तर रोहितला कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेतात. दुसरीकडे रोहित प्रसार माध्यमांसोबत आत्मविश्वासानं बोलताना दिसतो. रोहितचा आबांसारखा हा आत्मविश्वास पाहून त्याची आई सुमनताई पाटील गहिवरून गेल्यात.

आबा ज्या प्रमाणे राजकीय विरोधकांवर तुटून पडायचे, त्याच प्रकारे रोहितही कोणाचीही पर्वा करताना दिसत नाही. रोहित आक्रमक भाषेत विरोधकांना जोरदार टोले लगावतो.

Loading...

शिवसेनेचे उमेदवार माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यावर हल्ला चढवल्यानंतर आगामी काळातलं राजकारण कसं असेल, त्याचे संकेतही रोहितनं दिले.

सांगली जिल्ह्यातल्या तासगाव -कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात सुमनताई पाटील यांच्या प्रचाराची धुरा रोहित सांभाळत आहे. आता मतदार रोहितवर कितपत विश्वास टाकतात हे 24 तारखेला स्पष्ट होईल.

=========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 8, 2019 07:27 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...