SPECIAL REPORT : संघाच्या बौद्धिक बैठकीला जाऊन कसं वाटलं? विखे पाटील म्हणाले...

SPECIAL REPORT : संघाच्या बौद्धिक बैठकीला जाऊन कसं वाटलं? विखे पाटील म्हणाले...

नव्यानं भाजपात आलेल्या या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी जुळवून घेताना चांगलीच बौधिक कसरत करावी लागली

  • Share this:

विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी

 

नागपूर, 18 डिसेंबर : दरवर्षी  हिवाळी अधिवेशनाच्या काळात  भाजपच्या आमदारांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून मार्गदर्शन केलं जातं. यंदाही

नागपूरच्या रेशीम बागेत भाजप आमदारांचं बौधिक घेतलं. मात्र, बाहेरच्या पक्षातून भाजपात आलेल्या नेत्यांना नव्या विचारांशी जुळवून घेताना कसरत करावी लागत असल्याचं पाहण्यास मिळालं.

एकेकाळी काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीत असलेले गणेश नाईक...नव्यानं भाजपात आलेल्या या  काँग्रेस-राष्ट्रवादीच्या  नेत्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी  जुळवून घेताना चांगलीच बौधिक कसरत करावी लागली. हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्या भाजप आमदारांचं नागपूरच्या रेशीम बागेत संघाच्या नेत्यांनी बौधिक घेतलं.

राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक आणि नितेश राणे या पूर्वाश्रमीच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी हे सगळं काही नवीन आहे.  खरंतर आजवर या  नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेला कडाडून विरोध केला. पण, राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असं म्हटलं जातं.

भाजप आमदार गणेश नाईक हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक, मात्र गेली अनेक वर्ष ते राष्ट्रवादीत होते. आता भाजपात आल्यावर जुन्या विचारधारेचं काय? या प्रश्नावर  त्यांनी हे उत्तर दिलं.

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपनं नेत्यांची मेगा भरती केली होती. त्यामध्ये हे नेते  भाजपात डेरे दाखल झाले होते. आता त्यांना काँग्रेसची विचारधारा सोडून भाजपचा विचार अंगीकारताना कसरत करावी  लागतेय.

Published by: sachin Salve
First published: December 18, 2019, 11:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading