रोज 1700 टन घनकचरा करणाऱ्या पुण्यात फक्त 500 टन कचऱ्याचीच विल्हेवाट !

रोज 1700 टन घनकचरा करणाऱ्या पुण्यात फक्त 500 टन कचऱ्याचीच विल्हेवाट !

पुण्यात रोज 1700 टन घनकचरा निघतो. त्यातल्या फक्त 500 टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. त्यासाठी फुरसुंगी आणि उरूळी देवाची अशा दोन ठिकाणी प्रक्रिया प्रकल्प आहेत

  • Share this:

हलिमा कुरेशी,पुणे

03 मे : पुण्यातल्या कचरा कोंडीचा आजचा 18 वा दिवस आहे. सध्य स्थितीत पुण्याचे महापौर, पालकमंत्री हे अभ्यास दौऱ्यासाठी परदेशात आहेत. दरम्यान पुण्यातून कार्यकर्ते सक्रिय झाल्यानंतर फुरसुंगीच्या गावकऱ्यांनी आज कचरा डेपोचीच अंत्ययात्रा काढली.

कचरा पुण्याचा मग त्यानं आमची गावं घाण का करायची? असा सवाल घेऊन फुरसुंगीच्या गावकऱ्यांनी कचरा डेपोची अंत्ययात्रा काढली. ह्या अंत्ययात्रेचा सांगावा कालपासूनच सगळे लोकप्रतिनिधी, अधिकारी, गावकऱ्यांना धाडलेला होता. त्याला प्रतिसाद म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेही ह्या अंत्ययात्रेत सहभागी झाल्या होत्या.

पुण्यात रोज 1700 टन घनकचरा निघतो. त्यातल्या फक्त 500 टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. त्यासाठी फुरसुंगी आणि उरूळी देवाची अशा दोन ठिकाणी प्रक्रिया प्रकल्प आहेत. त्यातले काही बंद आहेत तर काही क्षमतेपेक्षा कमी चालतात.

पुण्यातला कचरा प्रश्न

 हंजर प्रकल्प  

- क्षमता - १००० टन

- दोन वर्षांपासून बंद  

 रोकेम  प्रकल्प

- क्षमता -  ७५० टन

  प्रत्यक्षात ३०० टन कचऱ्याच प्रक्रिया

पुण्याचा कचरा प्रश्न गेल्या 25 वर्षांपासून आहे. त्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे सत्ताधारी आले आणि गेले, आता भाजपचे आहेत पण पुण्याच्या कचऱ्यावर आणि गावकऱ्यांच्या मागणीवर कायमचा उपाय शोधलेला नाही. बदललं काही असेल तर आंदोलनाचे नेतृत्व करणार आहे.

देशभर पंतप्रधान मोदी हे स्वच्छ भारतचा नारा देतायत आणि त्यांचीच सत्ता असलेल्या पुण्यात त्याच स्वच्छतेचे तीन तेरा केले जातायत. पालकमंत्री, महापौर हे परदेश दौऱ्यावर आहेत. गरज आहे ते कुठलीही कारणं न देता पुणे आणि फुरसुंगी गाव तातडीनं स्वच्छ करण्याची.

First published: May 3, 2017, 10:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading