Elec-widget

SPECIAL REPORT : पुण्याला कुणी बुडवलं पाण्यात, कोण आहे जबाबदार?

SPECIAL REPORT : पुण्याला कुणी बुडवलं पाण्यात, कोण आहे जबाबदार?

काही भागात इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पुराचं पाणी पोहोचलं. या पाण्याने गोरबरीब कुटुंब अक्षरश: रस्त्यावर आली आहेत.

  • Share this:

पुणे, 27 सप्टेंबर : मुसळधार पावसामुळं पुणे शहराच्या काही भागात भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली होती. तर काही भागात इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पुराचं पाणी पोहोचलं. या पाण्याने गोरबरीब कुटुंब अक्षरश: रस्त्यावर आली आहेत.

बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानं महिलेचं सगळं काही हिरावून घेतलं आहे. दांडेकर पूल परिसरातील नाल्याला आलेल्या पुरात इथली वस्ती होत्याची नव्हती झाली. कष्टकऱ्यांच्या या वसाहतीत पुराच्या पाण्यानं अक्षरश: थैमान घातलं होतं. पै-पै जमा करुन जमा केलेला संसार मातीमोल झाला.

मित्रमंडळ चौक परिसरात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेनं हालचाल करुन त्या आईसह त्या बाळाची पाण्यातून सुटका केली.

पुण्यातील कात्रज, धनकवडी परिसरात पावसामुळं भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली होती. काही भागात इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पुराचं पाणी साचलं होतं.

कात्रज तलाव ओसंडून वाहू लागल्यामुळे या परिसरातील अनेक सोसायट्यांना पाण्यानं वेढा घातला होता. इमारतीच्या संरक्षक भिंती तोडून पुराचं पाणी इमारतीत शिरलं. त्यामुळं इमारत परिसरतील उभी असलेली वाहनं वाहून गेली.

Loading...

मुसळधार पाऊस आणि पुराच्या पाण्याचा फटका या परिसरातील गोशाळांनाही बसला आहे. पुराच्या पाण्यात ३०हून अधिक जनावरे वाहून गेली. या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं गुरुवारी पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती या तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. या पूर परिस्थितीमुळं पुणेकर पुरते हादरून गेले आहे.

===============================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 26, 2019 06:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...