SPECIAL REPORT : पिंपरी चिंचवडमध्ये घडलं 'आरे' प्रकरण, हजारो झाडांवर चालवली कुऱ्हाड!

SPECIAL REPORT : पिंपरी चिंचवडमध्ये घडलं 'आरे' प्रकरण, हजारो झाडांवर चालवली कुऱ्हाड!

पिंपरी चिंचवड महापालिकेनं स्वतःच वृक्षसंवर्धनाचे नियम धाब्यावर बसवून झाडांची कत्तल केल्याचं उघड झालं आहे.

  • Share this:

गोविंद वाकडे, प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड, 13 डिसेंबर : पिंपरी चिंचवड महापालिकेनं स्वतःच वृक्षसंवर्धनाचे नियम धाब्यावर बसवून झाडांची कत्तल केल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे पर्यावरणवाद्यांनी पालिकेच्या कारभाराचा निषेध केला.

पिंपरीतल्या चिखली परिसरातील झाडांची कत्तल करण्यात आली आहे. हजारो झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात येतेय. तर आणखी झाडांची कत्तल करण्यात येणार आहे.

मात्र, झाडं तोडताना नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप होतोय.  झाडं तोडण्यास अनेक संघटना आणि पर्यावरण प्रेमींचा विरोध आहे.  मात्र, त्यांचा विरोध डावलून झाडांची कत्तल करण्यात आली.

धक्कादायक म्हणजे पालिकेनं त्यांच्या परिसरातील झाडं तोडून ठेकेदाराला रान मोकळ करून दिल्याचा आरोप होत आहे. तर चुकीच्या मापदंडावर झाडांची कत्तल करण्यात आल्याचंही पर्यावरण प्रेमींचं म्हणणं आहे.

झाडांची कत्तल करून त्या ठिकाणी पालिका प्रशासन जलशुद्धीकरण केंद्र उभारणार आहे.  पालिकेचं झाडं तोडण्याविरोधातील धोरण न्यूज 18 लोकमतनं वारंवार जनतेसमोर आणलं.  त्यानंतर पालिकेनं एक झाडं तोडल्यास त्या ऐवजी पाच झाडं लावणार असल्याचं आश्वासन दिलं होतं..

मात्र, प्रत्यक्षात झाडं तोडल्यानंतर एकही झाडं लावलं नसल्याचं समोर आलंय. त्यामुळं पर्यावरण प्रेमींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना झाडं वाचवण्याची विनंती केली आहे.

विकास कामांना कुणाचाही विरोध नाही. मात्र, पर्यावरणाची हानी होऊ नये याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. एवढचं या निमित्तानं सांगणे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2019 08:45 AM IST

ताज्या बातम्या