SPECIAL REPORT :...त्यात 'या' दोन जुळ्या लेकींचा काय दोष हो!

SPECIAL REPORT :...त्यात 'या' दोन जुळ्या लेकींचा काय दोष हो!

मुलींच्या वडिलांकडे बिल भरण्यसाठी पैसे नव्हते. त्यांनी आधीच एक मुलगी असल्याचंही सांगितलं.

  • Share this:

सचिन जिरे, प्रतिनिधी

औरंगाबाद, 04 नोव्हेंबर : नवजात जुळ्या मुलींच्या उपचाराचं बील भरणं शक्य नसल्यानं मुलींना हॉस्पिटलमध्ये सोडून आई आणि नातेवाईक पसार झाले. पोलिसांनी चिमुरडीच्या वडिलांना फोन केला. मात्र, आर्थिक कारण आणि आधीच एक मुलगी असल्याचं कारण सांगत त्यांनी मोबाईल बंद केला. औरंगाबादमध्ये ही धक्कादायक घटना घडली.

या दोन निरागस मुलींसाठी आता मायेचा हात राहिला नाही. ज्या आईच्या कुशीत या जुळ्या मुली हव्या होत्या, ती त्यांची आई प्राची भंडारी पोटच्या मुलींना हॉस्पिटलमध्ये सोडून गेली. ज्या हॉस्पिटलमध्ये या जुळ्या मुलींवर उपचार सुरू होते, तिथे बिल भरायला सांगितल्यावर मुलींची आई आणि नातेवाईक पसार झाले.

हॉस्पिटलकडून मुलींच्या पालकांना वारंवार फोन करण्यात आले. पण त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हॉस्पिटलणं ही बाब पोलिसांना कळवली. पोलिसांनी मुलींच्या वडिलांशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी बील भरण्यासाठी पैसे नाहीत, आधीच एक मुलगी आहे असं सांगून मोबाईल बंद केला.

मुलींचं वजन कमी असल्यानं त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. या प्रकरणाचा अहवाल पोलिसांनी बाल कल्याण समितीकडे सोपवला. समितीनं दोन्ही मुलींना संगोपनासाठी भारतीय समाज सेवा केंद्र अनाथालयाच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले.

मुलींच्या वडिलांकडे बिल भरण्यसाठी पैसे नव्हते. त्यांनी आधीच एक मुलगी असल्याचंही सांगितलं. मात्र, या जुळ्या मुलींऐवजी जर जुळी मुलं झाली असती तर त्या पित्यानं त्यांना टाकून दिलं नसतं. त्यामुळे पैशाच्या सबबीऐवजी त्यांना मुली नको होत्या, हे ही एक कारण असल्याचं स्पष्ट होतं. यावरून समाजात अजूनही मुलांचा किती हव्यास आहे, हे दिसून येतं.

=======================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 4, 2019 09:16 PM IST

ताज्या बातम्या