SPECIAL REPORT : भावाला तिसऱ्यांदा करतील का पंकजा मुंडे पराभूत, काय आहे आव्हानं?

SPECIAL REPORT : भावाला तिसऱ्यांदा करतील का पंकजा मुंडे पराभूत, काय आहे आव्हानं?

वरळीनंतर राज्याचं लक्ष लागलेल्या परळीत सर्वात मोठी फाईट रंगत आहे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे विरुद्ध विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात...

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी

परळी, 03 ऑक्टोबर : वरळीनंतर राज्याचं लक्ष लागलेल्या परळीत सर्वात मोठी फाईट रंगत आहे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे विरुद्ध विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात. दोघांनीही जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

विधानसभा निवडणुकीतली सर्वात मोठी फाईट बीडमधल्या परळीत होतीय. मुंडे विरुद्ध मुंडे या बहिण भावाच्या या लढाईत दोघांनीही जबरदस्त शक्तीप्रदर्शन करत एकमेकांसमोर जोरदार आव्हान उभं केलं आहे.

निर्णायक लढाईला निघण्याआधी पंकजा मुंडेंचं आईंनी औक्षण केलं तर तिकडे धनंजय मुंडेंचही त्यांच्या कुटुंबीयांनी औक्षण केलं. पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गडावर जावून आशिर्वाद घेतले तर धनंजय मुंडेंनीही गोपीनाथ गड आणि वडील पंडीतअण्णा मुंडेंच्या समाधीवर जावून दर्शन घेतलं. त्यानंतर उमेदारी अर्ज दाखल करायला आलेले दोघंही बहिण भाऊ अचानक आमने सामने आले त्यावेळी त्यांनी एकमेकांकडे साधं पाहिलंही नाही.

परळीच्या मैदानात दोन वेळा धनंजय मुंडेंचा पराभव करणाऱ्या पंकजा मुंडेंना यावेळी कडव्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.

एकमेकांचे कट्टर विरोधक अशी ओळख असलेले मुंडे बहिण भाऊ एकमेकांना धोबीपछाड देण्याची एकही संधी सोडत नाहीत. परळी नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना चीत केलं तर जिल्हा परिषदेची सत्ता खेचून आणत विधान परिषद आणि लोकसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना धोबीपछाड दिला. पण आताची लढाई ही दोघांसाठीही आरपारची आहे. त्यांच्या राजकीय अस्तित्वाची आहे.

अशावेळी परळीची जनता कुणाच्या पारड्यात आपलं दान टाकते याकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

============================

First published: October 3, 2019, 9:27 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading