SPECIAL REPORT : तुमच्या चारित्र्याचे फॉरेन्सिक पुरावेच देईल, पुतण्याने काढले काकाचे वाभाडे!

बीडमधील क्षीरसागर काका पुतण्याची राजकीय लढाई आता थेट चारित्र्यावर येऊन ठेपली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 5, 2019 08:12 PM IST

SPECIAL REPORT : तुमच्या चारित्र्याचे फॉरेन्सिक पुरावेच देईल, पुतण्याने काढले काकाचे वाभाडे!

सुरेश जाधव, प्रतिनिधी

बीड, 05 ऑक्टोबर : बीडमधील क्षीरसागर काका पुतण्याची राजकीय लढाई आता थेट चारित्र्यावर येऊन ठेपली आहे. काकाने पुतण्याच्या चात्रिऱ्यावर बोट ठेवताच पुतण्याने थेट काकाविरोधात थेट फॉरेन्सिक पुरावाच सादर करण्याचा गर्भित इशारा देऊन टाकला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतण्याचा राजकीय संघर्ष तसा नवा नाही. पण बीडमधील क्षीरसागर काका-पुतणे मात्र, आतापासूनच परस्परांचे वस्त्रहरण करून करू लागले आहे. काका जयदत्त क्षीरसागर यांनी पुतण्या संदीपवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात पुतण्याने थेट काकांच्या जुन्या भ्रष्टाचाराची कुंडलीच बाहेर काढण्याची धमकी देऊन टाकली.

हे काका-पुतणे एकमेकांचे भ्रष्टाचारच काढून थांबले नाहीतर त्यांनी आता एकमेकांच्या चारित्र्यावरही शिंतोडे उडवायला सुरुवात केली. पुतण्या संदीपने काका जयदत्त क्षीरसागरांना गर्भित इशाराच दिला आहे.

राष्ट्रवादीने पुतण्याला हवा देताच जयदत्त क्षीरसागरांनी शिवसेनेत उडी मारून मंत्रिपदही मिळवलंय. आता हेच दोन्ही काका-पुतणे बीडच्या राजकीय आखाड्यात एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहे. त्यामुळे मतदान होईपर्यंत केसरकाकूंच्या घराण्याचे हे दोन्ही राजकीय वारसदार बीडकरांसमोर आणखी काय काय वाढून ठेवताहेत हे त्यांचं त्यांनाच ठाऊक...

Loading...

===================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 5, 2019 08:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...