SPECIAL REPORT : भाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली, घड्याळ की कमळ?

SPECIAL REPORT : भाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली, घड्याळ की कमळ?

सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला.

  • Share this:

माढा, 21 सप्टेंबर : सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. पण माढा लोकसभा मतदारसंघात भाजपनं राष्ट्रवादीला धोबीपछाड दिल्यापासून माढा विधानसभा मतदारसंघातील समीकरणं बदलून गेली आहे.

माढा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार बबनराव शिंदेंनी आतापर्यंत पाच वेळा विजय मिळवला. सीना माढा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून माढ्यातील दुष्काळी भागाला पाणी देत हरितक्रांतीच स्वप्न आमदार शिंदेनी फुलवलंय. 1995 साली अपक्ष निवडून आल्यानंतर पुढे राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहून त्यांनी या ठिकाणाहून चार वेळा प्रतिनिधित्व केलं. यावेळीही विजय मिळवत आपण सिक्सर मारू असा त्यांना विश्वास आहे.

शिवसेनेकडून जलसंधारण मंत्री तानाजी सावंतांचे बंधू प्राध्यापक शिवाजी सावंत सलग पाच वेळा आमदार बबनराव शिंदेंच्या विरोधात लढत राहिले. यावेळी माढ्यात बदल घडवण्याच्या हेतूनं शिंदे विरोधकांना एकत्र आणण्याच्या हालचाली सुरू आहेत.

दरम्यान, आमदार बबनदादा शिंदे हे राष्ट्रवादीपासून दुरावत असून ते सध्या भाजपच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पण त्यांच्या भाजप प्रवेशात भाजपचे संजय कोकाटे कट्टर विरोधक सावंत बंधूंचा अडसर आहे.

2009 ला झालेल्या विधानसभा पुनर्रचनेनंतर पंढरपूर मधील 42 गावं आणि माळशिरस तालुक्यातील चौदा गावं माढा विधानसभा मतदारसंघाला जोडल्यामुळे पंढरपूरचे परिचारक आणि माळशिरसच्या मोहिते-पाटीलांची भूमिकाही मतदारसंघात महत्वाची ठरती. त्यात बबन शिंदे यांचे बंधू संजय मामा शिंदेंचा लोकसभेत पराभव करत भाजपनं राष्ट्रवादीचा बालेकिल्ला सर केल्यानं समीकरण बदलून गेलं आहे.

भाजप आणि शिवसेनेला ज्या मतदारसंघात आजवर कधीच शिरकाव करता आला नाही पण 2014 च्या मोदी लाटेनं पहिली धडक देत 2019 मध्ये मतदारसंघ काबीज केला. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात विजयाचा सिक्सर मारणं शिंदेंसाठी सोप्पं नक्कीच नाही.

=========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2019 10:23 PM IST

ताज्या बातम्या