SPECIAL REPORT : नारायण राणेंच्या प्रवेशामुळे भाजपला वाटतेय 'ही' भीती?

एनडीएकडून नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाविषयी कोणतंच भाष्य करण्यात आलेलं नाही. मात्र, राणेंकडून प्रवेशाची तारीख पे तारीख सुरू आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 11, 2019 07:07 PM IST

SPECIAL REPORT : नारायण राणेंच्या प्रवेशामुळे भाजपला वाटतेय 'ही' भीती?

 दिनेश केळुसकर, प्रतिनिधी

 सिंधुदुर्ग, 11 ऑक्टोबर : एनडीएकडून नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाविषयी कोणतंच भाष्य करण्यात आलेलं नाही. मात्र, राणेंकडून प्रवेशाची तारीख पे तारीख सुरू आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत राणेंनी पुन्हा त्यांचा पक्ष विसर्जित करण्याच्या कथा सुनावली.

सिंधुदुर्गात भाजप आणि राणेंच्या स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांचे संयुक्त मेळावे सुरू आहेत. तर मागील काही महिन्यांपासून राणेंचं भाजप प्रवेशाकडं लक्ष लागलंय. राणे स्वत: प्रवेशाचा मुहूर्त सांगतात. मात्र, एनडीएकडून त्यावर प्रतिक्रिया दिली जात नाही. आता 15 ऑक्टोबरला पक्ष विसर्जित करण्याचा नवा मुहूर्त राणेंनी जाहीर केला.

कपाट निशाणीवर सावंतवाडी आणि कुडाळ मधून शिवसेना उमेदवारांविरोधात उभे असलेल्या राणे समर्थक अपक्ष उमेदवारांना भाजपनं पुरस्कृत केलं आहे. राणेंना दोन महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये घेतलं असतं तर वेगळं चित्र दिसलं असतं असं, स्वाभिमानचे पदाधिकारी सुनावताना दिसत आहेत.

लवाजम्यासह नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राणे पक्ष हायजॅक करतील अशी भीती भाजप नेत्यांमध्ये निर्माण झाली आहे. मात्र, नेते राणेंमुळे पक्ष आता हायजॅक होण्याऐवजी हाउसफुल्ल झाल्याचं सांगत आहे.

Loading...

नारायण राणेंनी नितेश राणेंना विधानसभेचं तिकीट मिळवून दिल्यानं त्यांचं भाजपमध्ये असलेलं वजन सिद्ध झालंय. मात्र, त्यांचा भाजपप्रवेश अधांतरीच असल्याचं दिसून येतं.

शिवसेनेच्या केसरकरांविरोधात सावंतवाडी लढवणारे भाजप पुरस्कृत उमेदवार राजन तेली हे ओरिजिनल राणेंचेच कट्टर समर्थक आणि कुडाळमधून वैभव नाईकांविरोधात लढवणारे भाजप पुरस्कृत उमेदवार रणजीत देसाई हे देखील राणेंचेच कट्टर कार्यकर्ते. त्यामुळे जर राजन तेली, रणजीत देसाई आणि नितेश राणे हे तिघेही निवडून आले तर मात्र, राणे कोकणातला भाजपचा हुकुमाचा एक्का होणार हे नक्की आहे.

=====================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2019 07:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...