SPECIAL REPORT : नारायण राणेंचं विधानामुळे भाजपच्या गोटात खळबळ!

SPECIAL REPORT : नारायण राणेंचं विधानामुळे भाजपच्या गोटात खळबळ!

नारायण राणे त्यांच्या रोखठोक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. शिवसेनेत आणि काँग्रेसमध्ये असतानाही बेधडक वक्तव्य करून राणे अनेकदा अडचणीत आले. अर्थात राणेंनी त्याची कधी पर्वा केली नाही

  • Share this:

दिनेश केळुसकर, प्रतिनिधी

सिंधुदुर्ग, 19 सप्टेंबर : नारायण राणेंनी त्यांच्या भाजप प्रवेशाचा नवा मुहूर्त जाहीर केला आहे. सत्ताधारी पक्षात सुरू असलेलं इन्कमिंग म्हणजे नैतिकता म्हणता येणार नाही, असं वक्तव्य करून नारायण राणेंनी खळबळ उडवून दिली.

नारायण राणे त्यांच्या रोखठोक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. शिवसेनेत आणि काँग्रेसमध्ये असतानाही बेधडक वक्तव्य करून राणे अनेकदा अडचणीत आले. अर्थात राणेंनी त्याची कधी पर्वा केली नाही. आताही नारायण राणेंनी सत्ताधारी पक्षांमध्ये सुरू असलेल्या मेगाभरतीवर परखड भाष्य केलं.

राज्यात सध्या शिवसेना भाजपची युती होणार की नाही, यावर जोरदार चर्चा सुरू आहे. युतीच्या विषयावरही राणेंनी भाष्य केलं.

भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी नारायण राणे उत्सुक आहेत. राणे त्यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलिन करणार आहेत. आठ दिवसात भाजपप्रवेश होईल असा दावा राणेंनी केला.

पत्रकारांनी यावेळी नाणार प्रकरणी नारायण राणेंना त्यांची प्रतिक्रिया विचारली. मात्र, भाजपमध्ये गेल्यावर नाणारवरची भूमिका स्पष्ट करू, असं राणे म्हणाले. एकंदरीतच निवडणुकीच्या काळात राणेंचा प्रवेश आणि नाणारचा मुद्दा गाजणार असल्याचं स्पष्ट होतंय.

=============

Published by: sachin Salve
First published: September 19, 2019, 8:38 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading