SPECIAL REPORT : नागपूरचा नवरदेव पाकिस्तानची नवरी, सुरू झाली 'गदर' कहाणी!

SPECIAL REPORT : नागपूरचा नवरदेव पाकिस्तानची नवरी, सुरू झाली 'गदर' कहाणी!

पाकिस्तानमधल्या मुलीशी विवाह झालेल्या विशाल नागपालला त्याची पत्नी अंजलीला व्हिसा कधी मिळणार याची प्रतिक्षा लागली.

  • Share this:

प्रशांत मोहिते, प्रतिनिधी

नागपूर, 02 नोव्हेंबर : सिनेमासारखा प्रसंग नागपुरातल्या एका युवकाच्या आयुष्यात निर्माण झाला. पाकिस्तानमधल्या मुलीशी विवाह झालेल्या विशाल नागपालला त्याची पत्नी अंजलीला व्हिसा कधी मिळणार याची प्रतिक्षा लागली. दोघांच्या लग्नाला एक वर्ष होत आलंय. त्यामुळे नागपाल कुटुंबानं सरकारकडे मदतीची याचना केली.

गदर सिनेमातल्या तारासिंग आणि सकिनासारखी वेळ विशाल नागपाल आणि अंजलीवर आली आहे. 24 नोव्हेंबर 2018 रोजी विशाल आणि अंजलीचं पाकिस्तानातल्या जेकामाबादमध्ये लग्न जालं. विशालच्या लग्नासाठी नागपूरहून पाकिस्तानला वऱ्हाड गेलं. आता या लग्नाला एक वर्ष होईल. मात्र, पाकिस्तानात असलेली नवरी अंजलीला अजूनही तिचं सासर असलेल्या नागपूरला येता आलेलं नाही. त्यामुळे अंजलीनं व्हिडिओच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडं घातलंय.

गदर सिनेमातल्या सनी देओलप्रमाणे विशाल नागपाल हतबल झालाय. आता व्हिसा मिळेल नंतर मिळेल या आशेवर वर्ष लोटलं पण अंजली काही नागपूरला आलीच नाही. दोन्ही देशातल्या तणावांचा फटका नागपाल कुटुंबाला बसला.

लग्नानंतर सुखी संसाराला सुरूवात करण्याऐवजी अंजली आणि विशालच्या नशिबी व्हिसाची प्रतीक्षा करणं आलंय. दोन्ही देशातले संबंध लवकरात लवकर चांगले होऊन अंजलीला व्हिसा मिळावा, अशीच सगळ्यांची इच्छा आहे.

=============================

First published: November 2, 2019, 9:42 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading