Elec-widget

SPECIAL REPORT : राज ठाकरेंच्या सभेसाठी पुणेकराकडून सॉलिड पुणेरी तोडगा!

SPECIAL REPORT : राज ठाकरेंच्या सभेसाठी पुणेकराकडून सॉलिड पुणेरी तोडगा!

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पुण्यातील सभेवर पावसानं पाणी फेरलं. त्यावर आता मनसेनं नवा उपाय शोधला आहे.

  • Share this:

अद्वैत मेहता आणि अक्षय कुडकेलवार, प्रतिनिधी

मुंबई, 11 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रस्त्यावर सभा घेण्याची परवानगी मनसेनं निवडणूक आयोगाकडं मागितली आहे. पावसामुळं जाहीर सभा रद्द करण्याची नामुष्की मनसेवर आली आणि त्यामुळेचं मनसेनं ही मागणी केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पुण्यातील सभेवर पावसानं पाणी फेरलं. त्यावर आता मनसेनं नवा उपाय शोधला आहे. मतदानाला अवघे काही दिवस उरले असून परतीच्या पावसामुळं राजकीय पक्षांची चांगलीचं कोंडी केली आहे. त्याचा पहिला फटका राज ठाकरेंच्या सभेला बसला. पावसामुळे पुण्याती राज ठाकरेंची पहिली सभा रद्द करावी लागली. त्यामुळचं मनसेनं रस्त्यावर सभा घेण्याची परवानगी निवडणूक आयोगाकडं मागितली.

मनसेच्या या मागणीवर पुणेकरांनी खास पुणेकरशैलीत प्रतिक्रिया दिली. तर मुंबईकरांना मात्र कोणतीचं हरकत नाही.

सततच्या वाहतूक कोंडीमुळं आधीच वाहनचालक हैराण झाले आहेत. तर तिकडं फूटपाथवर पथारीवाल्यांच्या साम्राज्यामुळं पादचाऱ्यांना वाट काढणं कठीण झालं आहे. अशातच रस्त्यावर सभांना परवानगी दिल्यास सर्वसामान्य नागरिकांची कोंडी होणार हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

Loading...

==================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 11, 2019 09:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...