• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : अर्धपोटी राहून पुण्यात शिक्षण घेताय मराठवाड्यातील तरुण, घरची वाटही अडली
  • SPECIAL REPORT : अर्धपोटी राहून पुण्यात शिक्षण घेताय मराठवाड्यातील तरुण, घरची वाटही अडली

    News18 Lokmat | Published On: May 2, 2019 09:14 PM IST | Updated On: May 2, 2019 09:16 PM IST

    वैभव सोनवणे, पुणे, 02 मे : दुष्काळाचे चटके केवळ गावात राहणाऱ्यांना सहन करावे लागत आहेत असं नाही. तर गावातून शिक्षणासाठी शहरात आलेल्या विद्यार्थ्यांनाही त्याची झळ सोसावी लागत आहे. त्यांना शिक्षण सोडून पोटासाठी मिळेल ते काम करण्याची वेळ आली आहे. मराठवाड्यातले अनेक तरूण पुण्यात शिक्षण घेत आहेत. आता कॉलेजला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. मात्र, हे विद्यार्थी गावाकडे परतले नाहीत. आधीच दुष्काळ असल्यानं गावाकडे जाऊन करायचं तरी काय? हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. या प्रश्नाचं उत्तरही त्यांनी शोधलंय आणि हे उत्तर म्हणजे, मिळेल ते काम करा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading