SPECIAL REPORT : माओवाद्यांच्या हाती लागले हायटेक हत्यार, सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट!

SPECIAL REPORT : माओवाद्यांच्या हाती लागले हायटेक हत्यार, सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट!

माओवाद्यांचा बिमोड करण्यासाठी दंडकारण्यात तैनात असलेल्या सुरक्षा यंत्रणांवर हल्ला करण्यासाठी माओवाद्यांच्या हाती नवं हत्यार आलंय.

  • Share this:

महेश तिवारी, प्रतिनिधी

गडचिरोली, 22 नोव्हेंबर : माओवाद्यांकडून आता सुरक्षा दलाच्या विरोधात नवी रणनिती समोर आल्यानं सुरक्षा यंञणा चक्रावून गेल्या आहे. सुरक्षा दलावर हल्ला करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याचा माओवाद्यांचा डाव उघड झाला आहे. यामुळे दंडकारण्यात सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

माओवाद्यांचा बिमोड करण्यासाठी दंडकारण्यात तैनात असलेल्या सुरक्षा यंत्रणांवर हल्ला करण्यासाठी माओवाद्यांच्या हाती नवं हत्यार आलंय. ड्रोनसारख्या नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेत माओवाद्यांनी सुरक्षा दलांना टार्गेट करण्याचा डाव आखला आहे.

सर्वाधिक हिंसक कारवायांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सुकमा जिल्ह्यातील किस्टारम आणि पालोडीच्या केंद्रीय राखीव दलाच्या शिबीराजवळ ड्रोन उडताना दिसले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे.

ज्या ठिकाणी केंद्रीय राखीव दलाच्या जवानाच्या शिबीरावर हे ड्रोन आले तो परिसर चार राज्याचा सीमावर्ती भाग आहे. या भागात रस्ते वीज मोबाईलसह कुठल्याही सुविधा उपलब्ध नाहीत. तसंच हा माओवाद्यांचा सतत हालचाली असलेला भाग असून हल्ला करून माओवादी दुसऱ्या राज्यात पसार होतात. ड्रोनच्या माध्यमातून सुरक्षा दलाच्या शिबीराची भौगोलिक माहिती घेण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न असल्याचं मानलं जातंय.

माओवाद्यांच्या विरोधात गेल्या चार वर्षात दंडकारण्यात सुरक्षा दलांनी आक्रमक अभियान राबवल्यानं माओवादी चळवळ बॅकफुटवर गेली आहे. त्यामुळे नव्या पद्धतीनं थेट केंद्रीय निमलष्करी दलालाच लक्ष्य करण्याचे माओवाद्याचे प्रयत्न हाणून पाडणं सुरक्षा दलांसमोरचं आव्हान असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 22, 2019 08:34 AM IST

ताज्या बातम्या