SPECIAL REPORT : 'लालपरी'ची चाकं रुतली, विलिनीकरण होणार?

SPECIAL REPORT : 'लालपरी'ची चाकं रुतली, विलिनीकरण होणार?

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सध्या डबघाईला आल्यानं कर्मचाऱ्यांना पगार देण्याइतका पैसाही महामंडळाकडे नाही

  • Share this:

मुंबई, 11 डिसेंबर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सध्या डबघाईला आल्यानं कर्मचाऱ्यांना पगार देण्याइतका पैसाही महामंडळाकडे नाही. कारण, या महिन्यात एसटीच्या 31 पैकी 11 विभागातील कर्मचाऱ्यांना केवळ 60 टक्केच पगार मिळाला. अवकाळी पावसामुळे पूर्ण पगार दिला गेला नाही. परिणामी महामंडळाचं विलिनीकरण करण्याची मागणी केली जात आहे.

महिन्याला येणाऱ्या पगारावर कुटुंब अवलंबून असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना हा महिना जरा जडच जाणार आहे. आधीच पगार पुरेसा नसतांना त्यात साठ टक्केच पगार हाती आल्यानं संसाराचा गाडा हाकायचा कसा हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

अजब प्रकार म्हणजे या पगार कपातीसाठी अवकाळी पाऊस जबाबदार असल्याचं एसटी महामंडळाच्या वतीनं सांगितलं जातंय. तर दुसरीकडे आज ना उद्या महामंडळ डबघाईला येणार याची आम्हाला कल्पना असल्यामुळेच एसटी महामंडळाचं विलिणीकरण करा, अशी मागणी पूर्वीपासून करत असल्याचं काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी सांगितलं.

वेतनात किती टक्क्यांची कपात?

ठाणे - 60 टक्के कपात

सातारा - 80 टक्के कपात

सिंधुदुर्ग - 70 टक्के कपात

रत्नागिरी - 81 टक्के कपात

अकोला- 70 टक्के कपात

एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाची मागणी पूर्ण करू असा विश्वास कामगार संघटनांनी व्यक्त केला आहे.

Published by: sachin Salve
First published: December 11, 2019, 7:27 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading