...मग शेतकरी संपावर गेला तर चुकलं काय ?

...मग शेतकरी संपावर गेला तर चुकलं काय ?

शेतीचं अर्थकारण हे व्यापारी, दलाल आणि पुढाऱ्यांनी हातात घेतल्यामुळे स्वत:च्याच शेतात शेतकरी गुलामीच जगणं जगतोय. त्यातून वाढत गेलेला हा उद्रेक आहे.

  • Share this:

दिनेश केळुसकर, सिंधुदुर्ग

01 जून : राजकारण होत राहतं...पण आर्थिकदृष्ट्या कंबरडं मोडलेला पिचलेल्या शेतकऱ्याकडे ना सरकारचं लक्ष आहे ना पुढाऱ्यांचं...मग शेतकरी संपवार गेला तर चुकलं काय, हा प्रश्न निर्माण होतो.

संसाराचा गाडा कसा ओढायचा आणि जगायचं कसं हा शेतकऱ्यांच्या बायकापोरांसोपुढचा प्रश्न आहे. वर्षानुवर्षे शेतात अपार कष्ट उपसूनही शेतकरी आणि त्याचं कुटुंब पिचलेलं आहे. सरकार कोणतंही असो त्यानं शेतकऱ्यांना कधीच सीरियसली घेतलं नाही. आणि शेतकऱ्यांच्या जीवावर चालणाऱ्या शेतकरी संघटनांचे पुढारीही कापूस, कांदा आणि प्रामुख्यानं उसाच्या राजकारणातच अडकले. भाजीपाला, दूध, फळं, कडधान्य पिकवणाऱ्या मोठ्या शेतकरी वर्गाचा या पुढाऱ्यांनी कधी विचारच केला नाही. सर्वसामान्य नागरिकांची रोजची गरज भागवणारा हा वर्ग दुर्लक्षित राहिला.

29 रुपये किलोची सरकी पेंड जनावराना घालून जर २० रुपये लिटर दूध जात असेल तर या शेतकऱ्याचा उद्रेक होणं साहजिक आहे. उत्पादन खर्चावर आधारीत शेतमालाला भाव मिळणं हा या देशातल्या शेतकऱ्याचा हक्कच आहे. पण मनमोहन सरकारपासून स्वामीनाथन अहवाल फक्त संसदेतल्या चर्चांपुरता मर्यादीत राहिलाय.

शेतीचं अर्थकारण हे व्यापारी, दलाल आणि पुढाऱ्यांनी हातात घेतल्यामुळे स्वत:च्याच शेतात शेतकरी गुलामीच जगणं जगतोय. त्यातून वाढत गेलेला हा उद्रेक आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याचा ना सरकारवर विश्वास राहिलाय ना संघटनांच्या नेत्यांवर.. कृषीप्रधान देशातली आणि सर्वात मोठी सहकार चळवळ असणाऱ्या पुरोगामी राज्यातली ही शोकांतिका आहे.

First published: June 1, 2017, 9:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading