SPECIAL REPORT : कर्नाटकात 'ऑपरेशन लोटस' फत्ते, आता मोदींचं मिशन महाराष्ट्र?

SPECIAL REPORT :  कर्नाटकात 'ऑपरेशन लोटस' फत्ते, आता मोदींचं मिशन महाराष्ट्र?

महाराष्ट्रात शिवसेनेनं काँग्रेस, राष्ट्रवादीचा हात धरत आघाडी केल्यानं मोदींचा हा इशारा सुचक मानला जात आहे.

  • Share this:

मुंबई, 09 डिसेंबर : कर्नाटकात भाजपचं ऑपरेशन लोटस आज फत्ते झालंय. आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे लागलेल्या पोटनिवडणुकीत भाजपनं मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे कर्नाटकातलं भाजप सरकार बहुमतात आलंय. त्यात मोदींनी जनादेशाचा अनादर करणाऱ्यांना इशारा दिल्यानं सगळ्यांच्या नजरा महाराष्ट्राकडे लागल्या आहे.

कर्नाटकात भाजपनं ऑपरेशन लोटस यशस्वी करून एक मोठी मोहीम फत्ते केली आहे. कर्नाटकातील पोटनिवडणुकीत भाजपनं दणदणीत यश मिळवत सरकार तर तारलंच. पण आता मोदींनी इतर राज्यातील बिगर भाजप सरकारला थेट इशारा दिला आहे.

223 जागांच्या विधानसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. भाजपकडे सध्या १०५ आमदार, काँग्रेसकडे ६६ आमदार तर जेडीएसचे ३४ आमदार होते. बहुमतसाठी भाजपला 114 आमदारांची गरज होती पण ते बहुमतापासून थोडक्यात दूर राहिले.

पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कर्नाटकात काँग्रेस जेडीएसनं एकत्रित येत सरकार स्थापन केलं. पण भाजपनं ऑपरेशन लोटस राबवत काँग्रेस जेडीएसच्या 17 आमदारांना राजीनामा द्यायला लावला. त्यामुळे काँग्रेस जेडीएसचं सरकार औटघटकेचं ठरलं. त्यानंतर सत्तेवर आलेल्या येडियुरप्पांना सरकार टिकवण्यासाठी 15 जागांपैकी 7 जागा निवडून आणणं आवश्यक होतं. आता पोटनिवडणुकीत भाजपनं मोठं यश मिळवत सरकार तारलंय.

फोडाफोडीच्या राजकारणाला आळा घालण्यासाठी संसदेनं पक्षांतरबंदी कायदा आणला पण भाजपनं ऑपरेशन लोट्ससारखी पळवाट शोधून ती यशस्वी करून दाखवली. त्यामुळे मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थानसारख्या मोठ्या राज्यांमध्ये भाजपला बहुमतापासून काहीसं दूर राहावं लागलं. या राज्यात ऑपरेशन लोटससारख्या वाटेवरून भाजप सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करू शकतं.

मध्यप्रदेशात काही दिवसांपूर्वीच ज्योतिरादित्य शिंदेंचं नाराजीनाट्य समोर आलं होतं. त्यात महाराष्ट्रात शिवसेनेनं काँग्रेस, राष्ट्रवादीचा हात धरत आघाडी केल्यानं मोदींचा हा इशारा सुचक मानला जात आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात कुठला भूकंप होणार का हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Published by: sachin Salve
First published: December 9, 2019, 9:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading