SPECIAL REPORT : कमलेश तिवारी हत्येचं गुजरात कनेक्शन, प्रकरणाला नवं वळण!

SPECIAL REPORT : कमलेश तिवारी हत्येचं गुजरात कनेक्शन, प्रकरणाला नवं वळण!

हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारींची दोन दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. आता या हत्याप्रकरणाला वेगळंच वळण मिळलं आहे.

  • Share this:

मुंबई, 19 ऑक्टोबर : हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारींची दोन दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. आता या हत्याप्रकरणाला वेगळंच वळण मिळलं आहे. या हत्येमागे आयसिसचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. इतकंच नाही तर गुजरात एटीएसनं या हत्येप्रकरणी तिघांना ताब्यात घेतलं आहे. हिंदू महासभेच्या नेत्याच्या हत्येनंतर कोणत्या दिशेनं सुरू आहे याबद्दलचा हा आढावा..

हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारींची लखनऊमध्ये दिवसाढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आली. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली. तिवारींच्या गळ्यावर वार करून आणि गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. या हत्येमुळं शेकडो संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. तिवारींच्या कुटुंबानंही आक्रमक भूमिका घेतली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बोलावण्याची मागणी त्यांनी केली. तर दुसऱ्या बाजूला पोलिसांचा तपासही सुरूच होता. हत्येच्या ठिकाणी पोलिसांना मिठाईचा बॉक्स सापडला. हा बॉक्सच तपासात महत्त्वाचा ठरला. ती मिठाई सुरतमध्ये खरेदी करण्यात आली होती. त्या दुकानातलं सीसीटीव्ही फुटेज आणि लखनौमधल्या सीसीटीव्ही फुटेजवरून हल्लेखोरांची ओळख पटली. पोलीस आणि एटीएसनं वेगानं कारवाई करून संशयितांना ताब्यात घेतलं.

कमलेश तिवारींच्या हत्येचा सूत्रधार रशीद पठाण, मौलाना मोहसिन शेख आणि फैजानला ताब्यात घेण्यात आलंय. तर हत्येचे आरोपी मईनुद्दीन शेख आणि अशफाक शेखचा शोध सुरू आहे. या दोघांनी सूरतमधून चाकू आणि मिठाई खरेदी केली होती. त्यानंतर मईनुद्दीन आणि अशफाकनं लखनौमध्ये जाऊन तिवारींची हत्या केली.

कमलेश तिवारींच्या हत्येचा कट गुजरातमध्ये रचण्यात आला. दोन राज्यातले हल्लेखोर आणि हत्येासाठी वापरण्यात आलेली आयसिसची पद्धती पाहून आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनाही यात सामिल असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येतं आहे.

=============================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 19, 2019 09:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading