SPECIAL REPORT : उद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...

पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा कामगारांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. याच मतदारसंघात अंबड आणि सातपूर या दोन प्रमुख औद्योगिक वसाहती आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 21, 2019 09:54 PM IST

SPECIAL REPORT : उद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 21 सप्टेंबर : नाशिकच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघातून कामगार आणि उद्योजकांच्या प्रश्नांची जाण असलेल्या व्यक्तीला उमेदवारी मिळावी अशी मागणी उद्योजकांनी केली आहे. उद्योजक असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिल्यास नाशिकमधील उद्योजक आणि कामगार मिळून त्याला बहुमताने विजयी करू, असा दावा या उद्योजकांनी केला आहे.

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उद्योजक आणि कामगरांच्या प्रश्नांची जाण असलेल्या व्यक्तीला उमेदवारी मिळावी यासाठी नाशिकमधील उद्योजक एकत्र आले आहे. पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा कामगारांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. याच मतदारसंघात अंबड आणि सातपूर या दोन प्रमुख औद्योगिक वसाहती आहे. मात्र, या मतदारसंघाच्या स्थापनेपासून एकही मोठा उद्योग आजवरच्या लोकप्रतिनिधींना आणता आला नाही.

विशेष म्हणजे हा मतदार संघ भाजपच्या ताब्यात असून नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात निमाचे विद्यमान अध्यक्ष भाजपचे नगरसेवक शशिकांत जाधव आणि भाजपचे उद्योग आघाडीचे पदाधिकारी प्रदीप पेशकार हे देखील या मतदारसंघातून सत्ताधारी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे उद्योजकांच्या या मागणीने जाधव आणि पेशकार यांच्या भाजपतील दावेदारीला बळ मिळालं आहे. आता नाशिकमधील उद्योजकांच्या या मागणीला सत्ताधारी भाजप प्रतिसाद देणार की इतर पक्ष या मागणीचा फायदा घेत संधीचं सोनं करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

=====================

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2019 09:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...