SPECIAL REPORT : विखे पाटलांमुळेच माझा पराभव, भाजपच्या माजी मंत्र्याचा घरचा अहेर!

SPECIAL REPORT :  विखे पाटलांमुळेच माझा पराभव, भाजपच्या माजी मंत्र्याचा घरचा अहेर!

नगर जिल्ह्यातील विधानसभेच्या एकूण 12 जागांवर भाजपला विजय मिळवून देण्याचा दावा त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटलांनी केला होता

  • Share this:

प्रशांत बाग, प्रतिनिधी

अहमदनगर, 14 डिसेंबर :  अहमदनगर जिल्ह्यातील भाजपच्या पराभूत उमदेवारांनी पक्षाला घरचा अहेर दिला आहे. राधाकृष्ण विखे पाटलांमुळचं आपला पराभव झाल्याचा आरोप माजी मंत्री राम शिंदेंसह नगर जिल्ह्यातील भाजपच्या तीन पराभूत उमेदवारांनी केला.

एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्यातील भाजप नेत्यांची खदखद उफाळून आली आहे. राम शिंदे, शिवाजी कर्डीले आणि स्नेहलता कोल्हे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. आपल्या पराभवासाठी  राधाकृष्ण विखे पाटील हे जबाबदार असल्याचा आरोप या पराभूत नेत्यांनी केला.

तर, जिल्ह्यात आपलं एकमुखी नेतृत्व प्रस्थापित व्हावं यासाठी विखे पाटलांनी पाडापाडीचं राजकारण  केल्याचा दावा शिवाजी कर्डीले यांनी केला.

लोकसभा तसंच विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपात नेत्यांची मेगा भरती केली होती. त्यावेळी पुत्र सुजय विखेंपाठोपाठ राधाकृष्ण विखे पाटीलही भाजपात डेरे दाखल झाले होते.

नगर जिल्ह्यातील विधानसभेच्या एकूण 12 जागांवर भाजपला विजय मिळवून देण्याचा दावा त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटलांनी केला होता. मात्र, प्रत्यक्षात गेल्यावेळच्या जागाही भाजपला राखता आल्या नाहीत. 2014 मध्ये भाजपला जिल्ह्यात 5 जागा मिळाल्या होत्या. यंदा केवळ 3 जागांवर यश मिळवता आलंय.

त्यामुळे पराभूत उमेदवारांनी विखे पाटलांविरोधात मोर्चा उघडला आहे. या नेत्यांनी विखे पाटलांविरोधात पक्षाकडं  तक्रारीचा पाढा वाचला आहे. त्यामुळं आता पक्षाकडून कोणती कारवाई होणार याकडं अवघ्या जिल्ह्याचं लक्ष्य लागून राहिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 14, 2019 11:19 PM IST

ताज्या बातम्या