SPECIAL REPORT : फ्रान्सिस दिब्रिटोंच्या निवडीमुळे का आला विहिपच्या पोटात गोळा?

SPECIAL REPORT : फ्रान्सिस दिब्रिटोंच्या निवडीमुळे का आला विहिपच्या पोटात गोळा?

उस्मानाबादमध्ये होवू घातलेल्या 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन वादाची ठिणगी पडली.

  • Share this:

गोविंद वाकडे, प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड, 24 सप्टेंबर : साहित्य संमेलन आणि वाद हे जणू समीकरण बनलं आहे. 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरुन वादाला सुरुवात झाली आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटोंच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीला विश्वहिंदू परिषदेनं विरोध केला.

उस्मानाबादमध्ये होवू घातलेल्या 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन वादाची ठिणगी पडली. लेखक, समाजसुधारक आणि धर्मोपदेशक अशी ओळख असलेल्या फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची

संमेलनाध्यक्षपदी एकमतानं निवड करण्यात आली. मात्र, त्यांच्या निवडीला विश्वहिंदू परिषदेनं विरोध केला. दिब्रिटो हे सक्तीनं धर्मांतरण करतात तसंच त्यांचा हिंदू संतांना विरोध असल्याचा आरोप विश्वहिंदू परिषदेनं केला.

फ्रान्सिस दिब्रिटो यांनी 'पथिकाची नामयात्रा' या अनुवादित पुस्तकापासून आपली लेखनयात्रा सुरू केली. 'गिदीअन', 'आनंदाचे तरंग', 'मदर तेरेसा', 'पोप दुसरे जॉन पॉल', 'मुलांचे बायबल', अशा धार्मिक पुस्तकांचं लेखन त्यांनी केलं. धर्मचिकित्सा करणारा 'परिवर्तनासाठी धर्म' हा लेखसंग्रह, शैलीतील 'ओअॅसिसच्या शोधात', 'संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची' ही प्रवासवर्णने, 'सृजनाचा मोहोर' 'सृजनाचा मळा', 'तेजाची पाऊले' हे प्रासादिक शैलीतील ललितलेखसंग्रह अशा विविध वाङ्मय प्रकारांत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी आला ठसा उमटवला आहे.

मात्र, धर्मांतर आणि ख्रिस्ती धर्मातील अनिष्ठ प्रथांविषयी ते सोईची भूमिका घेतात असा विश्वहिंदू परिषदेचा आक्षेप आहे.

जानेवारी 2020मध्ये उस्मानाबादमध्ये 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे. लेखिका अरुणा ढेरे यांच्या नंतर एकमतानं अध्यक्षपदी निवडीचा मान फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना मिळाला. खरं तर त्यांच्या निवडीचं साहित्यक्षेत्रातून स्वागत होत असतानाचं विश्वहिंदू परिषदेनं त्याला विरोध केल्यामुळं नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

=================

Published by: sachin Salve
First published: September 24, 2019, 10:40 PM IST
Tags:

ताज्या बातम्या