Elec-widget

SPECIAL REPORT :..तर मुलीविरोधातच लढावं लागणार, खडसे आता काय निर्णय घेणार?

SPECIAL REPORT :..तर मुलीविरोधातच लढावं लागणार, खडसे आता काय निर्णय घेणार?

पक्षाने मला तिकीट नाकारल्याचं स्वतः खडसेंनीच जाहीर केलं आहे. त्यामुळे आता खडसे नेमका काय निर्णय घेतात याकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

  • Share this:

इम्तियाज अहमद, प्रतिनिधी

मुक्ताईनगर, 03 ऑक्टोबर : पक्षाने मला तिकीट नाकारल्याचं स्वतः खडसेंनीच जाहीर केलं आहे. त्यामुळे आता खडसे नेमका काय निर्णय घेतात याकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

एकनाथ खडसे...कधीकाळीचा प्रदेश भाजपचा बलाढ्य नेता आज स्वतःच्या तिकीटासाठी गलितगात्र झाल्याचं बघायला मिळतंय. सलग दुसऱ्या यादीतही खडसेंना स्थान तर मिळालंच उलट तुम्हाला तिकीट मिळणार नाही तुम्हाला कुणाचं नाव सुचवायचं असेल तर सांगा,असा उलटा निरोप पक्षाने खडसेंना पाठवला. स्वतः खडसेंनीच हे जाहीर केलं आहे.

तिकीट नाकारल्यानंतर खरंतर खडसे बंडखोरी करतील अपेक्षा होती. पण अद्यापही ते संयम बाळगून आहेत.

छगन भुजबळांनी तर खडसेंना राष्ट्रवादीत येण्याचं खुलं आमंत्रणच देऊन टाकलं आहे.

Loading...

खडसेचं तिकीट कापल्यानंतरही त्यांचे पक्षांतर्गंत गिरीश महाजन हे त्यांच्याबाबतीत भलतेच आशावादी आहेत. खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते असल्याचा उच्चार करतानाच ते भाजप सोडून कुठेही जाणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने फारतर खडसेंच्या मुलीला तिकीट देण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे हतबल खडसे स्वत:च्या मुलीसाठीचं तिकीट पदरात पाडून थंड बसणार की नव्या उर्मीने भाजपविरोधात बंड पुकारून सहाणूभूतीच्या लाटेवर स्वार होतात. हे येत्या काही तासातच स्पष्ट होईल. तसंही भाजप नेतृत्वानं खडसेंसमोर दुसरा पर्यायच ठेवलेला नाही.

================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 3, 2019 10:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...