SPECEAL REPORT : एकनाथ खडसेंची वाट खडतर, मुख्यमंत्र्यांनीच दिला सेना नेत्याला शब्द?

SPECEAL REPORT : एकनाथ खडसेंची वाट खडतर, मुख्यमंत्र्यांनीच दिला सेना नेत्याला शब्द?

भाजपात थेट मुख्यमंत्र्यांशी पंगा घेतल्याने खडसे हे असे एकाकी पडलेले असतानाच तिकडे मुक्ताईनगरमध्येही त्यांच्यासाठी यावेळची निवडणूक ही अशी अटीतटीची होऊन बसली आहे

  • Share this:

इम्तियाज अहमद, प्रतिनिधी

जळगाव, 20 सप्टेंबर : मुक्ताईनगर हा खरंतर खडसेंचा बालेकिल्ला पण यावेळीही युती झाली नाहीतर त्यांच्यासमोर शिवसेनेच्या चंद्रकांत पाटलांचं अतिशय कडवं आव्हान उभं राहु शकतं. कारण, गेल्यावेळी ते अवघ्या नऊ हजार मतांनी पराभूत झाले होते.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरचे आमदार एकनाथ खडसे हे खरंतर कधीकाळीचे भाजपचे एक मातब्बर नेते...आधी विरोधी पक्षनेते आणि फडणवीस सरकार मंत्रिमंडळात प्रारंभी त्यांच्याकडे तब्बल 12 खाती होती. पण, त्यांची पांडुरंग चरणी बहुजन मुख्यमंत्री व्हावा, ही इच्छा काय बोलून दाखवली तिथून पुढे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला एकप्रकारची ओहोटीच लागली.

12 महिन्यातच त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला. तेव्हापासून ते एवढे विजनवासातच गेलेत की, आज त्यांना भाजपकडे एखाद्या साध्या आमदाराप्रमाणे तिकीटाची मागणी करावी लागत आहे.

खडसे मुक्ताईनगरचे सहा वेळा आमदार राहूनही शिवसेनेनं त्या जागेवर दावा ठोकला. सेनेचे चंद्रकांत पाटील यांनी तर थेट मुख्यमंत्र्यांनी आपल्याला ही जागा सोडण्याचा शब्द दिल्याचा दावा करत आहेत.

एरवी विधानसभेत खडसेंबाबत सहानुभूती व्यक्त करणारी राष्ट्रवादीही खडसेंना यावेळी पराभूत करण्याचे मनसुबे रचत आहे. खडसेंनी 12 खाती सांभाळूनही मुक्ताईनगरसाठी काहीच केलं नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे इच्छूक उमेदवार रवींद्र पाटील करतात.

भाजपात थेट मुख्यमंत्र्यांशी पंगा घेतल्याने खडसे हे असे एकाकी पडलेले असतानाच तिकडे मुक्ताईनगरमध्येही त्यांच्यासाठी यावेळची निवडणूक ही अशी अटीतटीची होऊन बसली आहे. अर्थात सहावेळा आमदार राहिलेले खडसे एवढ्या सहजासहजी हार मानतील ते खडसे कसले. आशा करूयात की, या खडतर वाटचालीतूनही नाथाभाऊ मुक्ताईनगरच्या विजयाची वाट सुकर करतील.

======================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2019 07:25 PM IST

ताज्या बातम्या