SPECIAL REPORT : शिष्यवृत्तीमध्ये महाघोटाळा, ईडी शोधणार घोटाळेबाज!

SPECIAL REPORT : शिष्यवृत्तीमध्ये महाघोटाळा, ईडी शोधणार घोटाळेबाज!

2010 ते 2017 या कालावधीत शिष्यवृत्तीमध्ये घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. बोगस विद्यार्थी दाखवून शिष्यवृत्ती लाटल्याचा संशय आहे.

  • Share this:

अद्वैत मेहता, प्रतिनिधी

पुणे, 06 नोव्हेंबर : राज्यातल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्तीमध्ये घोटाळा झाल्याच्या अहवालानंतर ईडीनं चौकशीला सुरूवात केली आहे. हजाराहून जास्त शैक्षणिक संस्थांना समाज कल्याण विभागानं शिष्यवृत्तीच्या अनुषंगानं माहिती देण्यास सांगितलं आहे.

मागील काही महिन्यांपासून माध्यमांमध्ये गाजत असलेली ईडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी राजकीय नव्हे तर शैक्षणिक घोटाळ्याच्या चौकशीची सूत्र ईडीकडे सोपवण्यात आली आहेत.

2010 ते 2017 या कालावधीत शिष्यवृत्तीमध्ये घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. बोगस विद्यार्थी दाखवून शिष्यवृत्ती लाटल्याचा संशय आहे. त्यामुळे सरकारनं अहवालानुसार ईडीनं चौकशीला सुरूवात केली आहे. सुमारे हजारपेक्षा जास्त शैक्षणिक संस्थाना समाज कल्याण विभागानं माहिती देण्यास सांगितलं आहे. 1 ते 14 नोव्हेंबरच्या दरम्यान महाविद्यालयांना ही माहिती द्यायची आहे.

2010 ते 2017 या सात वर्षात राज्यात दोन वेगवेगळे सरकारांनी कारभार पाहिला. त्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्ती घोटाळ्याच्या तपासाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

ईडीच्या चौकशीतून येणारी माहिती नक्कीच धक्कादायक असेल. विद्यार्थ्यांच्या हक्काची शिष्यवृत्तीवर कोणी हडपली हे त्यामुळे जगासमोर येईल.

=========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 6, 2019 09:28 PM IST

ताज्या बातम्या