सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी
औरंगाबाद, 11 जून : राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेलांपाठोपाठ धनंजय मुंडेंच्याही अडचणीत वाढ झाली आहे. अंबाजोगाईतील जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमीन प्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिला आहे. इनामी जमिनीची खरेदी-विक्री करता येत नसतानाही पदाचा गैरवापर करुन ही जमीन खरेदी केल्याचा आऱोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.
अधिवेशनाच्या तोंडावर धनंजय मुंडे यांच्या संकटात वाढ झाली आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात औरंगाबाद खंडपीठाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. सरकारी जमीन बेलखंडी मठाला इनाम दिली होती, तीच जमीन धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करून त्यांच्या जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतली.
खरंतर कुठलीही इनामी जमिनीचा खरेदी व्यवहार होत नाही. मात्र, इथं दबाव आणून खरेदी व्यवहार केल्याचे याचिकाकर्त्यांना म्हटलं आहे. याशिवाय कृषी जमीन असताना देखील अकृषिक करून घेतल्याचे देखील या याचिकेत म्हटलं आहे. याप्रकरणी याचिकाकर्ते राजाभाऊ फड यांनी बर्दापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र, तपासी अंमलदारांनी यात कुठलीही पावले उचलली नाहीत त्यामुळे त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली.
औरंगाबाद खंडपीठाने तपासी अंमलदारांवर देखील ताशेरे ओढले आहेत. आणि या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे.
काय आहे प्रकरण?
2010 ते 2012 या कालावधीत अंबाजोगाईतील जगमित्र सहकारी साखर कारखाण्यासाठी मुंडे यांनी बेलखंडी मठाची इनामी जागा खरेदी केल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केली. बेलखंडी मठाची 17 एकर 34 गुंठे जमीन असून त्यापैकी पूस गावातील मुंजा गीते नावाच्या शेतकऱ्यांकडून 7 एकर 32 गुंठे जमीन 50 लाख रुपयांमध्ये खरेदी करण्यात आली. मात्र, त्याचे पैसेही चुकते न केल्यामुळं गीते यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. ही जमीन शेतकऱ्यांना करारावर देण्यात आल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. इनामी जागेची खरेदी-विक्री करता येत नसतानाही मुंडेंनी आपल्या पदाचा गैरवापर करुन ही जमीन खरेदी केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केलाय. खरंतर याचिकाकर्ते राजाभाऊ फड यांनी यापू्र्वीचं बर्दापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र, तपासी अंमलदारांनी कोणतीच कारवाई केली नाही.त्यामुळे त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. मंगळवारी मुंडेंवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश देतानाचं कोर्टानं तपासी अंमलदारावर ताशेरे ओढले. मात्र. जमिनीच्या सातबाऱ्यावर जमीन इनामी असल्याचा उल्लेख नसल्याचा दावा मुंडेंच्या वकिलांनी केला.
या प्रकरणी मुंडे वरच्या कोर्टात दाद मागणार असले तरी ऐन पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर कोर्टाच्या या आदेशामुळं अधिवेशनात विरोधकांची धार बोथट होणार आहे.
======================