Elec-widget

चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवारापुढे सेनेच्या बंडखोराचं आव्हान!

चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवारापुढे सेनेच्या बंडखोराचं आव्हान!

पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिवसेना गटनेतेपदी असलेली राहुल कलाटे हे कट्टर शिवसैनिक आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

  • Share this:

गोविंद वाकडे, प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड, 07 ऑक्टोबर : पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना-भाजपचा वर्चस्व असलेल्या चिंचवड मतदार संघात शिवसेनेच्या राहुल कलाटेंनी बंडखोरी करत महायुती समोर मोठं आव्हान उभं केलं आहे. या मतदार संघातील भाजपचे विद्यामान आमदार लक्ष्मण जगताप यांना कलाटेंना शह द्यावा लागणार आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिवसेना गटनेतेपदी असलेली राहुल कलाटे हे कट्टर शिवसैनिक आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. मात्र, तरीही त्यांनी बंडखोरी करत महायुतीच्या उमेदवाराला आव्हान दिल्याने त्यांची बंडखोरी रोखण्यात शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि महायुतीतील इतर नेत्यांना अपयश आल्याचं स्पष्ट झालं आहे.

या निवडणुकीच्या निमित्ताने कलाटे आणि जगताप पुन्हा एकदा आमने सामने येत आहे. मागील वेळी म्हणजे 2014 ला शिवसेना आणि भाजपची युती नसल्याने राहुल कलाटे सेनेचे तर लक्ष्मण जगताप भाजपचे उमेदवार होते. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे उमेदवार असल्याने चिंचवडमध्ये चौरंगी लढत झाली होती. मात्र, मोदी लाटेच्या प्रभावात लक्ष्मण जगताप ह्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. मात्र, त्याही परिस्थितीत कलाटे ह्यांना दोन नंबरची मते मिळाले होते आणि त्यामुळे कलाटे हेच जगताप यांना टक्कर देऊ शकतात हे स्पस्ट झालं होतं.

विरोधक एकवटले?

Loading...

या वेळी राष्ट्रवादीने मोठी खेळी करत चिंचवडच्या आखाड्यात आपला उमेदवार उतरवला नाही. तर मनसे आणि वंचित बहुजन आघाडीकडूनही उमेदवार दिला गेला नसल्याने या मोठ्या पक्षाचा पुरस्कृत उमेदवार म्हणून राहुल कलाटे यांना पाठिंबा जाहीर केला जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे सध्या चिंचवड विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात एकूण 11 उमेदवार उरलेले असले तरीही खरी लढत राहुल कलाटे आणि लक्ष्मण जगताप यांच्यातच होईल हे स्पष्ट आहे.

========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 7, 2019 11:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...