घरात रक्ताचा सडा, RPI नगरसेवकासह कुटुंबाला संपवणाऱ्या घटनेचा GROUND REPORT

या गोळीबारात खरात यांचे बंधू सुनील खरात आणि त्यांचा मुलगा सागर हे जागीच ठार झाले. हत्या झालेले नगरसेवक रवींद्र खरातवर सुमारे 50 गुन्हे दाखल होते.

News18 Lokmat | Updated On: Oct 7, 2019 10:58 PM IST

घरात रक्ताचा सडा, RPI नगरसेवकासह कुटुंबाला संपवणाऱ्या घटनेचा GROUND REPORT

इम्तियाज अहमद, प्रतिनिधी

भुसावळ, 07 ऑक्टोबर : भुसावळमधल्या भीषण हत्याकांडानं महाराष्ट्राचा थरकाप उडाला. हल्लेखोरांच्या गोळीबार आणि चाकू हल्ल्यात आरपीआय आठवले गटाच्या नगरसेवकासह पाच जण ठार झाले, तर चौघे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. हत्या झालेले नगरसेवक रवींद्र खरातवर सुमारे 50 गुन्हे दाखल होते.

घराच्या अंगणात पडलेला रक्ताचा सडा, भिंतीवरील रक्ताचे डाग, गोळीबारानंतर पडलेल्या पुंगळ्या पाहून हल्लेखोरांनी किती थंड डोक्यानं नगरसेवक रवींद्र खरातांचं कुटुंब संपवलं याचा अंदाज येतो. रविवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास खरात कुटुंब त्यांच्या अंगणात बसलेलं होतं. त्याचवेळी तीन हल्लेखोरांनी डाव साधला. घराच्या अंगणात येऊन त्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरूवात केला.

या गोळीबारात खरात यांचे बंधू सुनील खरात आणि त्यांचा मुलगा सागर हे जागीच ठार झाले. तर स्वत: रवींद्र खरात आणि त्यांचा मुलगा रोहित खरात आणि सुमित गजरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हल्ल्यात रवींद्र खरात यांची पत्नी रजनी खरात, मुलगा हितेश आणि अजून एकजण असे तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

रवींद्र खरात ऊर्फ हंप्या हा नगरसेवक असला तरी अट्टल गुन्हेगार म्हणून त्याची दहशत होती. त्याच्यावर आधी MPDAची कारवाई झाली होती. रवींद्र खरातच्या मुलानं शिवीगाळ केली होती, या रागातून आरोपींनी कुटुंबच संपवलं.

Loading...

ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत झालेल्या भीषण हत्याकांडामुळे शहर हादरलंय. नगरसेवक रवींद्र खरातवर सलग दुसऱ्यांदा हल्ला झाला. याआधी खरातच्या घरावर जमावानं दगडफेक करत गोळीबार केला होता. गावठी पिस्तूलातून हवेतून तीन फैरी झाडण्यात आल्या होत्या. त्यावेळी हल्ल्यातून खरात थोडक्यात बचावला. मात्र, यावेळी हल्लेखोरांनी पूर्ववैमनस्यातून अख्खं कुटुंब संपवलं.

=================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 7, 2019 10:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...