SPECIAL REPORT : पंकजा मुंडे वापरणार 'भुजबळ पॅटर्न', अशी आखणार रणनीती?

SPECIAL REPORT : पंकजा मुंडे वापरणार 'भुजबळ पॅटर्न', अशी आखणार रणनीती?

पंकजा मुंडे या याच वाटेवर असून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचा त्यांना कितपत फायदा होते हे भविष्यात स्पष्ट होईल.

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी

बीड, 12 डिसेंबर :  पंकजा मुंडेंच्या विधानसभा पराभवानंतर ते आज भगवानगडावर भाषणाला उभे राहीपर्यंत मागचे २ महिने बऱ्याच चर्चा रंगल्या. त्यात त्या नाराज असल्याच्या आणि पक्ष सोडण्याच्या चर्चेनं अधिक रंग भरला. पण आजच्या भाषणानंतर पंकजा मुंडे या भाजप पक्ष सोडणार नसल्या तरी पक्षात राहून सवतासुभा उभारणार आहेत. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून राजकीय पाठबळ निर्माण करण्याचे संकेत त्यांनी दिले आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे आता पक्षात राहून सवता उभारणार आहेत. गोपीनाथ गडावरून आपल्या सर्थकांना साद घातलतांना त्यांनी आपल्या पुढच्या राजकारणाची दिशा निश्चित केली आहे. आता गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाच्या माध्यमातून  राज्यभर आपला प्रभाव निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. हा भाजपसाठी गर्भित इशाराचं म्हणावं लागेल.

पंकजा मुंडे यांची पक्षातील घुसमट काही लपून राहिली नाही.  भाजप सोडणार नसल्याचं सांगतानाचं पक्षातील कोणत्याही पदावर न राहण्याची घोषणा करून एका प्रकारे त्यांनी स्वपक्षीयांना सूचक इशारा दिला.

पक्षात राहून संघटना अथवा संस्थेच्या माध्यमातून समांतर राजकीय ताकद उभी करण्याची राज्यातली ही काही पहिलीचं घटना नाही. खरंतर यापूर्वीही राज्यातील काही नेत्यांनी संघटनांच्या माध्यमातून आपली राजकीय पाळंमुळं मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी समता परिषद उभी केली. रयत महासंघाचा पाया काँग्रेस नेते  एकनाथ गायकवाड यांनी घातला तर राष्ट्रवादीत असतानाही विनायक मेटे यांनी शिवसंग्रामला बळ दिलं.

अशा समांतर संघटनांचा या नेत्यांना राजकारणात फायदाही झाला आहे. आता पंकजा मुंडेंही याच वाटेवर असून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचा त्यांना कितपत फायदा होते हे भविष्यात स्पष्ट होईल.

Published by: sachin Salve
First published: December 12, 2019, 11:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading