SPECIAL REPORT : बीडच्या तरुणाला तोड नाय, थेट फडणवीसांचीच मागितली 'खुर्ची'!

SPECIAL REPORT : बीडच्या तरुणाला तोड नाय, थेट फडणवीसांचीच मागितली 'खुर्ची'!

सोशल मीडियावर 'एक दिन का सीएम'चे मीम्स व्हायरल होत आहेत. राजकीय मीम्सही जोरात सुरू आहेत.

  • Share this:

सुरेश जाधव, प्रतिनिधी

बीड, 01 नोव्हेंबर : राज्यात राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे. तर दुसरीकडे भाजप शिवसेनेत सत्ता संघर्ष सुरू असल्यानं बीडमधल्या एका युवकानं मुख्यमंत्रिपद त्याच्याकडे सोपवण्याची मागणी केली आहे.

'नायक' सिनेमासारखी परिस्थिती प्रत्यक्षात आणि सोशल मीडियावर निर्माण झाली. सोशल मीडियावर 'एक दिन का सीएम'चे मीम्स व्हायरल होत आहेत. राजकीय मीम्सही जोरात सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे संजय राऊतांना राज्य चालवा, अशी विनंती करताना दिसत आहेत. इतकंच नव्हे तर आम्ही सामना अडीच अडीच वर्ष चालवतो, असंही हे दोन्ही नेते म्हणत आहेत.

रामदास आठवलेंवर तयार करण्यात आलेल्या सीएम पदाविषयीच्या कविताही चांगल्याच हसू फुलवत आहेत. सुमीच्या पतीला सीएम करण्याचा जोकही चांगलाच व्हायरल झाला आहे.

राज्यात आणि सोशल मीडियावर असा धुरळा उडालेला असतानाच एक आशेचा किरण निर्माण झालाय. अगदी मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटण्याचीही चिन्हं निर्माण झाली आहेत. बीड जिल्ह्यातल्या श्रीकांत गदळे या युवकानं महायुतीतला तिढा सुटेपर्यंत त्याला मुख्यमंत्री पदाचा पदभार द्यावा, अशी मागणी राज्यपालांकडे केली. त्याच्या मागणीचं निवेदन त्यानं जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलं आहे. इतकंच नव्हे तर निवेदनाची दखल घेतली नाही तर लोकशाही मार्गानं लक्षवेधी आंदोलन करण्याचा इशाराही श्रीकांतनं दिला.

राज्यपाल आता श्रीकांत गदळेच्या निवेदनावर काय निर्णय घेतात याकडे राज्याचं लक्ष लागलंय. राज्यपालांनी श्रीकांतला मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली तर नायक सिनेमातल्या अनिल कपूरप्रमाणे राजकारणातल्या नव्या नायकाची एंट्री होणार हे नक्की.

================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2019 09:46 PM IST

ताज्या बातम्या