SPECIAL REPORT : अशोक चव्हाणांच्या गडात होऊ शकते बॅलेट पेपरवर निवडणूक, 'हे' आहे कारण...

SPECIAL REPORT : अशोक चव्हाणांच्या गडात होऊ शकते बॅलेट पेपरवर निवडणूक, 'हे' आहे कारण...

विधानसभा निवडणूक ईव्हीएमवर नको तर बॅलेट पेपरवर घ्या ही विरोधकांची मागणी प्रत्यक्षात उतरू शकते. त्याबद्दलचा निर्णय निवडणूक आयोगाला घ्यावा लागू शकतो

  • Share this:

मुजिब शेख, प्रतिनिधी

नांदेड, 07 ऑक्टोबर : विधानसभा निवडणूक ईव्हीएमवर नको तर बॅलेट पेपरवर घ्या ही विरोधकांची मागणी प्रत्यक्षात उतरू शकते. त्याबद्दलचा निर्णय निवडणूक आयोगाला घ्यावा लागू शकतो. पण इच्छेनं नाही तर नाईलाजानं...

मंडळी गेल्या काही महिन्यांपासून देशभरात ईव्हीएमविरोधात विरोधकांनी रान पेटवलं. पण निवडणूक आयोगानं बॅलेट पेपरच्या मागणीला केराची टोपली दाखवली. असं असलं तरी नांदेड जिल्ह्यातील इच्छुकांच्या भाऊगर्दीनं निवडणूक आयोगासमोर मोठा पेच निर्माण झालाय. त्यातून मतदान बॅलेट पेपरवर घ्यावं लागणार आहे.

त्याचं झालंय असं, इच्छुकांच्या भाऊगर्दीनं आयोगाची कोंडी झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील 9 मतदार संघात एकूण ३२७ उमेदवार मैदानात उतरलेत. विशेष. म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या भोकर विधानसभा मतदारसंघातून तब्बल ९१ जणांनी उमेदवारी दाखल केली. एका ईव्हीएम मशीनवर नोटासह 16 बटण असतात. नोटाचं एक बटण वगळता 15 उमेदवार मावतात. याप्रमाणे चार मशीन्सवर 63 उमेदवारांची मर्यादा आहे. नांदेडमधल्या उमेदवारांच्या या विक्रमी संख्येमुळे निवडणूक विभागाची पंचाईत झाली. मतदान करण्यासाठी जास्तीत जास्त चार ईव्हीएम अर्थात मतदान यंत्र लावता येतात. 63 पेक्षा जास्त उमेदवार राहिल्या मतदानासाठी ईव्हीएम मशिन्स ऐवजी बॅलेट पेपरचा वापर करावा लागू शकतो.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 7 ऑक्टोबर आहे. तो पर्यंत निवडणूक आयोगाला वाट पाहावी लागणार आहे. त्यातही उमेदवारांची संख्या 63 पेक्षा जास्त राहिल्यास बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या लागू शकतात. तसं झालं तर विरोधकांची मागणी वेगळ्या अर्थानं मान्य होवून दूध का दूध आणि पाणी का पाणी होवू शकतं.

=========================

First published: October 7, 2019, 7:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading