SPECIAL REPORT : पिंपरीत 'आरे'ची पुनरावृत्ती, तब्बल 2 हजार झाडं तोडणार!

SPECIAL REPORT : पिंपरीत 'आरे'ची पुनरावृत्ती, तब्बल 2 हजार झाडं तोडणार!

पिंपरी चिंचवडमधल्या एका प्रकल्पासाठी सुमारे दोन हजार झाडं तोडण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतला आहे.

  • Share this:

गोविंद वाकडे, प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड, 21 नोव्हेंबर : पिंपरी चिंचवडमधल्या एका प्रकल्पासाठी सुमारे दोन हजार झाडं तोडण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतला आहे. विशेष म्हणजे ह्या गंभीर बाबीकडे सत्ताधारी,विरोधक आणि नागरिकांनीही दुर्लक्ष केलंय.

शहरातील चिखली परिसरातल्या बगवस्ती शेजारची झाडं, इथली फुलपाखरं-पक्षी आणि नजर जाईल तिथं पर्यंत दिसणारी हिरवळ हे दृश्य काही दिवसांनंतर दिसणार नाही. इथं जलशुद्धीकरण केंद्र उभारलं जाणार आहे. त्या प्रकल्पाच्या पर्यायी जागा उपलब्ध नसल्यानं ही झाडं तोडावी लागणार असल्याचं पालिका आयुक्तांनी सांगितलं.

इथं होणारी झाडांची कत्तल दुर्दैवीच म्हणावी लागेल. वृक्षतोडीपेक्षा उभारलं जाणारं जलशुद्धीकरण केंद्र नागरिकांच्या दृष्टीने अधिक महत्वाचं असल्याचं सांगितलं जात असल्यानं वृक्षतोडीला विरोध होताना दिसत नाही. मात्र, महापालिका प्रशासन स्वतःच तयार केलेल्या नियमांची पायमल्ली करत असल्याचा आरोप केला जात आहे.

एकूणच काय तर प्रत्येक ठिकाणी होऊ घातलेला विकास पर्यावरणाच्याच मुळावर येणार असेल तर त्याला शाश्वत विकास म्हणायचं हा खरा प्रश्न आहे.

===========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 21, 2019 10:53 PM IST

ताज्या बातम्या