SPECIAL REPORT : अमित शहा पवारांना जेलवारी घडवणार का?

शरद पवारांनी सोलापूर दौऱ्यात अमित शहांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना 'मी तुमच्याप्रमाणे जेल वारी केली', नसल्याची बोचरी टीका केली होती.

News18 Lokmat | Updated On: Sep 25, 2019 10:22 PM IST

SPECIAL REPORT : अमित शहा पवारांना जेलवारी घडवणार का?

मुंबई, 25 सप्टेंबर : शरद पवारांनी सोलापूर दौऱ्यात अमित शहांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना 'मी तुमच्याप्रमाणे जेल वारी केली', नसल्याची बोचरी टीका केली होती. त्यानंतर शिखर बँक गैरव्यवहारात पवारांवर ईडीकडून गुन्हा दाखल झाल्याचं समजताच राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. ही कारवाई राजकीय सूडबुद्धीतून तर झाली नाहीना, अशी शंका विरोधकांकडून उपस्थित केली जाऊ लागली.

सोलापूर दौऱ्यात शरद पवारांनी अमित शहांच्या टीकेला दिलेलं प्रत्युत्तर भाजप दिल्लीश्वरांच्या चांगलंच जिव्हारी लागलेलं दिसतं आहे. कारण त्यानंतर काही दिवसातच शरद पवारांवर थेट ईडीकडून गुन्हा दाखल झाला. तोही शिखर बँक घोटाळ्यात...विशेष म्हणजे या बँकेवर शरद पवार कधीही संचालक नव्हते. तरीही कर्जवाटप घोटाळ्यातील षडयंत्र पवारांनी केल्याचा संशय व्यक्त करत ईडीने हा गुन्हा दाखल केला. अर्थात पवारांनीही अमित शहाचं हे आव्हान जाहीरपणे स्वीकारलंय. मी स्वतः ईडीच्या कार्यालयात जाऊन त्यांचा पाहुणचारही घेईल, असा प्रतिटोला पवारांनी लगावला.

शरद पवार आणि अमित शहा या दोन नेत्यांमधील राजकीय संघर्षाची सुरूवात खरंतर सोलापूरच्या सभेतून झाली होती. महाजनादेश यात्रेच्या समारोप सभेत अमित शहांनी महाराष्ट्रासाठी काय केलं. असा जाहीर सवाल केला होता. त्यावरून बरंच रणकंदनही माजलं होतं.

2014 साली राज्यात भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या शरद पवारांच्याच राष्ट्रवादीला भाजपने 2019मध्ये मोठं खिंडार पाडलंय. मोहिते-पाटील, पिचड, उदयनराजे, शिवेंद्रराजे, महाडीक सारखे अनेक बडे नेते फडणवीसांनी भाजपात नेले. बरं हे कमी काय म्हणून आता तर थेट शरद पवारांवरच ईडीमार्फत गुन्हा दाखल झाला. त्यामुळे पवारांची राष्ट्रवादी पुरती हादरून गेली. तरीही न डगमगता पवारांनी ईडीच्या कारवाईचं उपहासात्मक स्वागत केलंय. एवढंच नाहीतर आपण काही झालं तरी दिल्लीच्या सत्तेपुढे तख्तापुढे झुकणार नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे या दोन बडया नेत्यांमधला राजकीय संघर्ष शरद पवारांनाही खरंच जेलची वारी घडवणार का हेच पाहायचं आहे.

Loading...

======================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 25, 2019 10:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...