SPECIAL REPORT : निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच बालेकिल्ल्यात सेनेला धक्का

SPECIAL REPORT : निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच बालेकिल्ल्यात सेनेला धक्का

पक्षातील नाराजांनी विद्यमान आमदाराच्या विरोधात दंड थोपाटात इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखतही दिली आहे.

  • Share this:

गणेश गायकवाड, प्रतिनिधी

अंबरनाथ, 21 सप्टेंबर : निवडणूक जाहीर झाली आणि अंबरनाथमध्ये शिवसेनेतली गटबाजी उफाळली. पक्षातील नाराजांनी विद्यमान आमदाराच्या विरोधात दंड थोपाटात इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखतही दिली आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या तोंडावर आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या विरोधातली नाराजी उफाळून आली आहे. नगरसेवक संदीप भराडे आणि सुबोध भारत यांनी उमेदवारीसाठी मुलाखत दिली. सुबोध भारत यांच्या बाजून बड्या पदाधिकाऱ्यांचा कल पाहायला मिळतोय. मतदारसंघात रखडलेली विकासकामं पर्ण करण्यासाठी बदल गरजेचा असल्याचं भारत यांनी सांगितलं.

दहा वर्षात केलेल्या कामांच्या जोरावर पक्ष तिकीट देईल असा विश्वास डॉ. बालाजी किणीकर यांनी व्यक्त केला.

दोन टर्म पूर्ण करणारे डॉ. बालाची किणीकर यांच्या विरोधातली नाराजी, हेच शिवसेनेसमोरचं मोठं आव्हान आहे.

=========================

Published by: sachin Salve
First published: September 21, 2019, 7:22 PM IST
Tags: ambaranath

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading