'माइक चालू दे, आपलं उघड असतं', भरसभेत अजितदादा जेव्हा फोनवर बोलतात..!

जाहीर सभेत भाषणादरम्यान नेते फोनवर बोलत नाहीत. मात्र, अजित पवारांनी समोर माईक सुरू असताना पक्ष पदाधिकाऱ्याशी खास आपल्या स्टाईलमध्ये संभाषण केलं.

News18 Lokmat | Updated On: Oct 5, 2019 10:18 PM IST

'माइक चालू दे, आपलं उघड असतं', भरसभेत अजितदादा जेव्हा फोनवर बोलतात..!

मधुकर गलांडे,प्रतिनिधी

इंदापूर, 05 ऑक्टोबर : जाहीर सभेत भाषणादरम्यान नेते फोनवर बोलत नाहीत. मात्र शुक्रवारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी समोर माईक सुरू असताना पक्ष पदाधिकाऱ्याशी खास आपल्या स्टाईलमध्ये संभाषण केलं. विषेश म्हणजे त्यांनी कार्यकर्त्याला माईक सुरूचं ठेवण्याची सुचनाही केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार कधी काय बोलतील याचा काही नेम नाही. इंदापूरच्या सभेत भाषणादरम्यान भोसरीतील पक्षाच्या पदाधिकाऱ्याशी फोनवरुन त्यांनी चक्क संवाद साधला. विषेश म्हणजे त्यांनी माईक सुरू ठेवण्यासं सांगितलं. खरं तर हा किस्सा असा आहे, की भोसरी विधानसभा मतदारसंघातून विलास लांडे राष्ट्रवादीकडून इच्छुक होते. आणि त्यामुळचं ते अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या मिनिटांपर्यंत अजित पवारांकडं विचारना करीत होते. मात्र लांडे यांच्या फोनमुळं इंदापुरात भाषण करीत असलेल्या अजित पवारांच्या भाषणात वारंवार अडथळा येत होता. अखेर अजित पवारांनी फोन उचलला आणि म्हणाले...

अजित पवार- हॅलो..

कार्यकर्ता - माइक बंद ठेवा

Loading...

अजित पवार-माइक चालू दे, आपलं उघड असतं

अजित पवार-हॅलो..

त्यांना म्हणावं तुला पाहिजे तो निर्णय घे

पुन्हा सारखा- सारखा फोन नको करु

आता ते विलास 10 मिनिटं कमी आणि आता म्हणतोय फॉर्म भरतो, मग इतके दिवस कुणी अडवलं होतं?

याच सभेत अजित पवारांनी एका जिवंत व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण वाहिली. 'गोविंदराव पाटील.. कारखाना उभा करण्यासाठी यायचे पायात चप्पल नसायची. ते म्हणायचे दिलीपराव की, अजित पवार ज्यावेळेस मी साखर बाहेर काढील. त्याचवेळी पायात चप्पल घालीन. त्यांनी साखर बाहेर काढली नंतर आज ते हयात नाहीत मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो', असं भरसभेत अजित पवार म्हणाले.

मात्र, आपली चूक लक्षात आल्यावर, 'सॉरी... मी चुकून गोविंदबापू म्हटलो, मला माफ करा. मी त्यांना पुढच्या वाटचाली करता शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभावं', अशा शब्दांत माफीही मागितली.

आपल्या बेधडक स्वभावासाठी अजित पवार ओळखले जातात. मात्र, त्याची मोठी किंमतही त्यांनी मोजावी लागली. इंदापुरातील त्यांच्या या भाषणाची कार्यकर्त्यांमध्ये बरीच चर्चा रंगली.

=================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 5, 2019 09:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...