नववीच्या अभ्यासक्रमात हे झाले आहेत बदल...

नववीच्या अभ्यासक्रमात हे झाले आहेत बदल...

नववीला सामान्य गणित हा विषय तुम्हाला घेता येणार नाही...यासह बरेच बदल इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमात करण्यात आले आहेत.

  • Share this:

स्वाती लोखंडे-ढोके, मुंबई

03 मे : जर बिजगणित भुमिती जमत नाही म्हणून सामान्य गणित हा विषय घेऊ असं जर वाटत असेल तर इकडे लक्ष द्या... कारण नववीला सामान्य गणित हा विषय तुम्हाला घेता येणार नाही...यासह बरेच बदल इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमात करण्यात आले आहेत.

गणित म्हटलं की, अनेकांच्या काळजात धस्स होतं. बिजगणित भुमिती या विषयांना पार करत इयत्ता दहावीत जाणाऱ्या विद्याऱ्यांचं प्रमाण कमी होऊ लागलं.. मग सरकारनं निर्णय घेत सामान्य गणित हा पर्याय अशा मुलांसाठी निर्माण केला. पण आता हाच पर्याय यावर्षीपासुन रद्द करण्यात येतोय.

खरंतरं गणितात ज्यांच डोकं चालत नव्हतं अशांसाठी २००९-२०१० या शैक्षणिक वर्षापासुन सुरू केलेल्या सामान्य गणितामुळे अनेक विद्यार्थ्यांच भलं होतं होतं. हे जरी खरं असलं तरी अनेकांचं नुकसानही झालं होतं. शाळेत व्यवस्थित माहिती न दिल्यानं सामान्य गणित घेणाऱ्या शेकडो मुलांना विज्ञान शाखेत प्रवेशच न घेता आल्यानं वैद्यकीय, इंजिनिअरींग सारख्या अभ्यासक्रमांना मुकावं लागलं होतं. साधारण १७ लाख मुलं दरवर्षी एसएससीची परिक्षा देतात पैकी १ ते दीड लाख मुलं ही सामान्य गणित घ्यायची.

यावर्षी जरी एसएससीच्या मुलांना सामान्य गणित घेता आला तरी पुढच्या वर्षांपासून सामान्य गणित या विषय घेता येणार नाही.

नववीच्या अभ्यासक्रमात झालेले आणखी काही बदल

--आयसीटी हा विषय काढून टाकण्यात आलाय

--अर्थशास्त्र हा विषय गणित आणि भूगोलमध्ये विलीन

--व्यवसायाभिमुख १० विषयांपैकी कोणताही एक कोर्स शाळांना सरकारच्या परवानगीने सुरू करता येईल

-- कार्यानुभवसारख्या V1, V2, V3 या विषयाऐवजी स्व-विकास आणि कलारसास्वादसारखा विषय

--शालेय प्रमाणपत्र विषयात संरक्षणशास्त्र

एकूणच काय शिक्षणपद्धती बदलताना अनेक गोष्टींचा विचार ना सरकार करतं ना अभ्यासक्रम मंडळ...आणि मग विद्यार्थ्याचं नुकसानं झालं की अनेक वर्षानी जाग येत शिक्षणपद्धतीत अचानक अनेक बदल केले जातात.

First published: May 3, 2017, 7:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading