नाशिक महापालिकेत 'डुक्कर' घोटाळा.. लाखो रुपयांची बिले काढून लावला चुना

नाशिक महापालिकेत 'डुक्कर' घोटाळा.. लाखो रुपयांची बिले काढून लावला चुना

ठेकेदाराने शहरातून एकही डूक्कर न पकडल्याच दाखवत पाच हजार रुपये दंडाची रक्कम भरून पालिकेच्या तिजोरीतून तब्बल एक लाख 10 हजार रुपयांनुसार आजतागयत 9 लाखांहून अधिक रकमेचे बिल काढून घेत महापालिकेला चुना लावला आहे.

  • Share this:

लक्ष्मण घाटोळे, (प्रतिनिधी)

नाशिक, 19 जून- सिंचन घोटाळा, घरकुल घोटाळा असे अनेक घोटाळे आपण आजपर्यंत पाहिले असतील. मात्र, नाशिक महापालिकेत घडलेला घोटाळा पाहून आपल्यालाही आश्चर्याचा धक्का बसेल. कारण हा घोटाळा आहे 'डुक्कर' घोटाळा या घोटाळ्याप्रकरणी पालिका आयुक्तांनी चौकशीचे आदेशही दिले आहे. नक्की काय आहे हा 'डुक्कर' घोटाळा, पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून..

आजपर्यंत आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे घोटाळे पाहिले असतील. मात्र, नाशिक महापालिकेत घडलेला हा डुक्कर घोटाळा पाहुन सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 'स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमांतर्गत नाशिक महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाने शहरातील डुक्कर पकडण्याचे कंत्राट काढले होते. मात्र, हे कंत्राट देताना ठेकेदाराच चांगभल कसे होईल, याचाच जास्त विचार करण्यात आला आहे. वास्तविक पाहता डुक्कर पकडल्यानंतर प्रतीडुक्कर अशी रक्कम ठेकेदाराला देणे क्रमप्राप्त होते. मात्र, तसे न करता महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दोनशे डुक्कर न पडल्यास पाच हजार रुपये दंड अशी विचित्र अट टाकून भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले आहे. महिनाभरानंतर घडलेही अगदी तसेच, सदर ठेकेदाराने शहरातून एकही डूक्कर न पकडल्याच दाखवत पाच हजार रुपये दंडाची रक्कम भरून पालिकेच्या तिजोरीतून तब्बल एक लाख 10 हजार रुपयांनुसार आजतागयत 9 लाखांहून अधिक रकमेचे बिल काढून घेत महापालिकेला चुना लावला आहे. मात्र, हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर संबंधित ठेकेदाराला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा घाटही घालण्यात आला आहे. मात्र, ही बाब पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर हे बिंग फुटले आणि आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश लेखा परीक्षण विभागाला दिले आहे.

नाशकात घडलेल्या या डुक्कर घोटाळ्यानंतर महापालिकेतील भ्रष्टाचारावर नागरिकांकडून संतप प्रतिक्रिया उमटत आहे. शहरात मोकाट डुकरांची संख्या कायम आहे. मात्र, असे असताना पालिका प्रशासनाने ठेकेदाराला लाखो रूपयांची रक्कम अदा केलीच कशी, असा सवालही उपस्थित केला जात आहे. मूलभूत सुविधांसाठी पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगणारे अधिकारी अशा घोटाळ्यांना प्रोत्साहन देतात तरी कसे? असाही प्रश्न या घोटाळ्यानंतर उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, या घटनेनंतर नाशिक महापालिकेचा आरोग्य विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या पूर्वी देखील याच विभागात 'स्वच्छ भारत अभियान' अंतर्गतच कचरापेटी घोटाळा उघडकीस आला होता. मात्र, आता महापालिकेतील अधिकारी आणि ठेकेदारांचा अभद्र युतीतून समोर आलेला हा डुक्कर घोटाळा पालिकेची अब्रू वेशीवर टागंणाराच आहे. त्यामुळे आता महापालिका आयुक्त या घोटाळ्यावर कशी आणि कुणावर कारवाई करणार, हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

VIDEO: आठवलेंच्या कवितेमुळे तुफान हशा! मोदी आणि राहुल गांधीही खळखळून हसले

First published: June 19, 2019, 3:50 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading