नासाचं ढग तयार करणारं मशीन? सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल

नासाचं ढग तयार करणारं मशीन? सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल

सोशल मीडियावर सध्या नासा या आंतरराष्ट्रीय अंतराळ संस्थेच्या नावाने एक ढग तयार करणाऱ्या मशीन्सचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 26 जून- सोशल मीडियावर सध्या नासा या आंतरराष्ट्रीय अंतराळ संस्थेच्या नावाने एक ढग तयार करणाऱ्या मशीन्सचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. पण हा व्हायरल व्हिडिओ मागचे नेमके फॅक्ट काय आहेत, हे आज आम्ही आपल्याला सांगणार आहे. तसेच कृत्रिम पाऊस नेमका कसा पाडला जातो, हे देखील तज्ज्ञांमार्फत समजावून सांगणार आहोत.

काय आहे व्हायरल व्हिडिओ मागचे सत्य?

सोशल मीडीयावर सध्या हा नासाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. विशेष म्हणजे बीबीसीसारख्या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेचा लोगो या व्हिडिओला वापरल्याने लोक देखील हा व्हिडिओ खरा समजत आहेत. पण खरंच नासानं अशा प्रकारचं कृत्रिम ढग तयार करणारं मशीन तयार केलंय का ? तर त्याचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही गुगल सर्च केलं तर हा व्हिडिओ फेक असल्याचं समोर आलंय. हा व्हिडिओ नासाचा असला तरी ती ढग तयार करणारी मशीन नसून तर ती आहे सॅटॅलाईटच्या रॉकेट इंजिनची चाचणी, शास्त्रीय भाषेत त्याला 'आरएस 25' असं म्हटलं जातं. हे इंजिन पेटवल्यानंतर त्यामधून मोठ्या प्रमाणावर ढगसदृश्य असे धुराचे लोट बाहेर पडताना दिसताहेत. प्रत्यक्षात तो धूर नसून ढगासारखी दिसणारी पाण्याची वाफ आहे. ज्याला आपण द्रवरुपी ऑक्सिजनही म्हणू शकतो. थोडक्यात काय तर शाळेत शिकवल्याप्रमाणे पाण्याची वाफ आकाशात गेली तिचं ढगात रुपांतर होतं, हे आपण अगदी लहानपणी शाळेतही शिकलो आहोत. असो, थोडक्यात कायतर हे कुठलंही ढग तयार करणारं मशीन नसून ते नासाचं रॉकेट इंजिन आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ 1 एप्रिल 2018 रोजी म्हणजेच 'एप्रिल फूल'च्या दिवशी इंटरनेटवर अपलोड केला गेल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे त्याच्या सत्यतेविषयी न बोललेलंच बरं...असो...मग आता तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल की, मग कृत्रिम पाऊस नेमका पाडतात तरी कसा...तर त्याचीही एक शास्त्रीय पद्धत आहे.

आकाशातील ढगांवर सोडिअम क्लोराईडची म्हणजेच मिठाची फवारणी करून कृत्रित पाऊस पाडण्याची पद्धत आपल्याकडे प्रचलित मानली जाते. मग ती फरावणी कधी रडारद्वारे तर कधी विशेष विमानाद्वारे केली जाते. यासोबतच गावाकडे अनेकदा जाळाच्या मोठमोठ्या भट्टया पेटवून त्यामध्ये मीठ टाकलं जातं आणि त्यातून निर्माण होणाऱ्या क्षाररुपी वाफेद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न होतो. या कृत्रिम पाऊस पाडण्याच्या भन्नाट प्रकाराला आपण फारफार तर गावठी पद्धतही म्हणू शकतो...(नेटवरून व्हिडिओ मिळू शकतील)

काय म्हणतात कृषी हवामान तज्ज्ञ?

कृत्रिम पद्धतीने पाऊस पाडता येत असला तरी त्याचं प्रमाण अतिशय अत्यल्प आहे. इस्त्रायल, कॅनडा लांब कशाला आपल्या भारतामध्येही अशा पद्धतीने कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग झालेला आहे तो देखील शासकीय खर्चाने...थोडक्यात काय तर नासाच्या नावाने फिरणारा हा कृत्रिम ढग तयार करणारा व्हिडिओ सध्यातरी फेकच असाच म्हणावा लागेल. कारण नासानेही याबाबत अजून कोणत्याही प्रकारचा अधिकृत खुलासा केल्याचं ऐकिवात नसल्याचे कृषी हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितले आहे.

VIDEO:साखर झोपेत असलेल्या 4 मुलांना भरधाव कारनं चिरडलं

First published: June 26, 2019, 6:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading