SPECIAL REPORT : कबुतरांचा सांभाळ करून त्याने कमावले लाखो रुपये!

SPECIAL REPORT : कबुतरांचा सांभाळ करून त्याने कमावले लाखो रुपये!

सिकंदर मुल्ला हा अवलिया चार पिढ्यापासून कबुतरे जोपासत आहेत. या कबुतराने मुल्ला यांना लाखो रुपये मिळवून दिले आहेत. तर त्याच्या या कबुतरांचा दिल्लीमध्ये ही डंका आहे

  • Share this:

असीफ मुरसल, प्रतिनिधी

 सांगली, 10 डिसेंबर : पूर्वीच्या काळी संदेशवाहक म्हणून पशुपक्षी, प्राणी यांचा वापर केला जायचा. यापैकी संदेशदुत आणि शांतीचे प्रतिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कबुतरांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असे. तंत्रज्ञानामुळे काळाच्या ओघात  त्यांचा राजाश्रय संपला वापर कमी झाला. मात्र, सांगली जिल्ह्यातील सिकंदर मुल्ला हा अवलिया चार पिढ्यापासून कबुतरे जोपासत आहेत. या कबुतराने मुल्ला यांना लाखो रुपये मिळवून दिले आहेत. तर त्याच्या या कबुतरांचा दिल्लीमध्ये ही डंका आहे.

कबुतर म्हटलं की, प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळेच तर संदेश पोहचण्यासाठी कबुतरांचा पूर्वी वापर केला जात होता. अनेक चित्रपटातही मोठ्या खुबीन कबुतरांचा वापर करण्यात आल्याचं आपण पाहिलं असेल. मात्र, हेच कबूतर आता लाखो रुपयांचं बक्षीस मालकांना मिळवून देत आहेत. आता तुम्ही म्हणालं हे कसं काय? तर ऐका दर वर्षी देशासह राज्यात कबुतरांची स्पर्धा भरवण्यात येते. त्या स्पर्धेत महाराष्ट्रातील कबुतरानं बाजी मारली आहे.

सर्वात उंच उडण्याचा आणि जास्तवेळ आकाशात राहण्याचा विक्रम मिरजेतील नांद्रे गावातील कबुतरांनी करून दाखवला. एवढचं नाही तर बक्षीसासाठीची तब्बल 5 लाख 38 हजारांची रक्कम मालकाला मिळवून दिली आहे.

नांद्रेतील कबुतरानं दिल्लीतही डंका वाजवला. नांद्रेतील कबुतरांनी सर्वाधिक काळ आकाशात राहाण्याचा विक्रम केलाय. त्यामुळं दिल्लीतून या कबुतरांना पाहाण्यासाठी खास पाहुणे येत असतात.  चार महिन्यांपूर्वी नांद्रेच्या याच कबुतरांनी बारा तास चार मिनिटे आकाशात विहार करून महाराष्ट्र केसरी किताब पटकावला होता.

आत्तापर्यंत या कबुतरांनी अनेक बक्षीसासह किताब जिंकले आहे. कबुतरांना स्पर्धेत उतरण्यासाठी त्यांना खास प्रशिक्षण दिलं जातंय. हाजी मुल्ला हे कबुतरांची वेळोवेळी काळजी घेतात. रोज कबुतरांना शाळू, करडा, नाचणी हे खाद्य त्यांना दिलं जातंय. तसंच स्पर्धेच्या दरम्यान, कबुतरांना खास बदाम दिले जातात. एवढचं नाही तर त्यांना उचं आकाशात उडण्यासाठी खास प्रशिक्षणही दिलं जातंय.

हाजी मुल्ला यांची चौथी पिढी कबुतराच्या व्यवसायात आहे. मुल्ला यांच्याकडे सहा जातीचे 60 कबुतरे आहे. त्यांच्या सुरक्षेसाठीही ते खास काळजी घेतात. तसंच विविध रोगांपासून कबुतरांचा बचाव केला जात आहे.

कबुतरांना मानमोडी, अटॅक यासह इतर रोग होतात. त्यापासून कबुतरांना जपावं लागतंय. कबुतरांचं सहा महिन्यांपासून एकदा लसीकरण करण्यात येतंय. रोज कबुतरांना दोन किलो धान्य द्यावं लागतंय. कबुतरांना विजेचा शॉक लागू नये, यासाठी खास काळजी घ्यावी लागते. श्वान, मांजर, ससाना, आणि घार यांच्या हल्ल्यापासूनही त्यांचा बचाव करावा लागतोय.

त्यामुळंच कबुतरांनी हाजी मुल्ला यांना त्यांच्या सेवेचं फळ दिलंय. देशात चांगला मान आणि पैसाही त्यांना या कबुतरांनी मिळवून दिला. त्यामुळं कबुतरांच्या या गगन फरारीचं संपूर्ण देशातून कौतुक होतंय.

Published by: sachin Salve
First published: December 10, 2019, 9:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading