• SPECIAL REPORT : भाजपचं मिशन बारामती आहे तरी काय?

    News18 Lokmat | Published On: Feb 10, 2019 06:32 AM IST | Updated On: Feb 10, 2019 07:37 AM IST

    वैभव सोनवणे, 10 फेब्रुवारी : पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या बुथ प्रमुखांना संबोधित करताना मुख्यमंत्री आणि अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं. यावेळी बारामतीची जागाही जिंकणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले की मुख्यमंत्र्यांचा जोश जरा जास्तच वाढतो. पुण्यातल्या मेळाव्यातही तेच चित्र बघायला मिळालं. याच जोशात मुख्यमंत्र्यांनी 45 जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त भाजपचं मिशन बारामतीही जाहीर करून टाकलं. आता मुख्यमंत्रीही पवारांवर बरसले म्हटल्यावर मग अमित शहांनीही पक्ष कार्यकर्त्यांकडून यावेळी बारामती जिंकण्याचा संकल्प वदवून घेतला. गेल्यावेळी बारामतीची जागा महादेव जानकर यांच्यासाठी सोडली होती. पण, यावेळी भाजपच बारामतीची जागा लढणार असल्याचा निश्चय भाजपने करून टाकला. राष्ट्रवादीने मात्र, भाजपच्या या मिशन बारामतीची खिल्ली उडवली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading